Honor चे भारतात दमदार पुनरागमन, लॉंच केला नवीन टॅबलेट; जाणून घ्या किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

honor pad 8 launched in india with snapdragon 680 soc check price specifications

Honor चे भारतात दमदार पुनरागमन, लॉंच केला नवीन टॅबलेट; जाणून घ्या किंमत

एका दीर्घ विश्रांतीनंतर 20 सप्टेंबरला म्हणजेच आज Honor ने भारतात पुनरागमन केले आहे. कंपनीने भारतात आपला Honor Pad 8 लॉन्च केला आहे. हा टॅब भारतीय बाजारपेठेपूर्वी जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आला होता. Honor Pad 8 ला 12-इंचाचा LCD डिस्प्ले आणि Snapdragon 680 प्रोसेसर सह सादर करण्यात आले आहे. डिस्प्लेमध्ये 2K रिझोल्यूशन सपोर्ट मिळतो. यासोबतच ब्लूटूथ v5.1 सह OTG सपोर्ट उपलब्ध आहे.

Honor Pad 8 ची किंमत

हा टॅबलेट सिंगल काळ्या रंगात सादर करण्यात आला आहे. तसेच Honor Pad 8 ला दोन रॅम व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. त्याच्या 4 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आणि 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डे 2022 सेलमध्ये टॅबलेट खरेदी करता येईल. सेलमध्ये, टॅबलेटचा 4 जीबी व्हेरिएंट 19,999 रुपयांच्या किंमतीला आणि 6 जीबी रॅम व्हेरिएंट 21,999 रुपयांच्या किंमतीला खरेदी केला जाऊ शकतो.

हेही वाचा: IIT Bombay : मोहालीनंतर IIT मुंबईत मुलीचा व्हिडिओ काढण्याचा प्रकार, एकाला अटक

ऑनर पॅड 8 चे स्पेसिफीकेशन्स

Honor Pad 8 मध्ये 12-इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे, जो 1200x2000 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 87 टक्के बॉडी टू स्क्रीन रेशोसह येतो. कमी प्रकाश आणि ब्लू प्रकाशासाठी याला TUV Rheinland सर्टिफीकेट मिळाले आहे. Honor Pad 8 मध्ये Android 12 आधारित MagicUI 6.1 देण्यात आला आहे. Honor Pad 8 ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेजसह येतो. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, Honor Pad 8 मध्ये 5 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सपोर्ट दिला आहे.

हेही वाचा: महिंद्राच्या 'या' गाड्यांच्या किमतीत वाढ, आता किती पैसे मोजावे लागतील वाचा

Honऑनर पॅड 8 ची बॅटरी

टॅब्लेटमध्ये 7250mAh बॅटरी आहे, जी 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. Honor Histen आणि DTS: X Ultra टॅबमध्ये 8 स्पीकर्सचा सपोर्ट देणात आला आहे. याचे डिझाइन युनिबॉडी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, हा टॅब ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ v5.1 आणि OTG सपोर्टसह येतो.

Web Title: Honor Pad 8 Launched In India With Snapdragon 680 Soc Check Price Specifications

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology