Electric Car : तुम्हाला माहितेय का इलेक्ट्रिक कार कशी काम करते? तर जाणून घ्या

इलेक्ट्रिक कारकडे लोकांचा कल झपाट्याने वाढला आहे.
Electric Car
Electric Carsakal

Electric Car : इलेक्ट्रिक कारकडे लोकांचा कल झपाट्याने वाढला आहे. लोक आता इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचाही विचार सुरू केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेली वाढ हे त्यामागील प्रमुख कारण आहे. इलेक्ट्रिक कार पेट्रोल-डिझेल किंवा इतर इंधनावर चालत नाहीत, त्या बॅटरीवर चालतात. तर, तुम्ही कधी विचार केला आहे की, इलेक्ट्रिक कार कशी कार्य करते? इलेक्ट्रिक कार चालवण्यात काही प्रमुख घटकांचा मोठा वाटा असतो. यामध्ये बॅटरी, चार्ज पोर्ट, डीसी/डीसी कन्व्हर्टर, इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मोटर, ऑनबोर्ड चार्जर, पॉवर इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर, थर्मल सिस्टम, ट्रॅक्शन बॅटरी पॅक आणि ट्रान्समिशन यांचा समावेश आहे.

हेही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

इलेक्ट्रिक कारचे प्रकार :

  • प्लग-इन इलेक्ट्रिक: ही कार पूर्णपणे विजेवर चालते आणि जेव्हा या कारला प्लग करून चार्ज केली जाते तेव्हाच या कारला पॉवर मिळते.

  • प्लग-इन-हायब्रीड: ही कार प्रामुख्याने विजेवर चालते, परंतु त्यासोबतच पेट्रोल किंवा डिझेल इंजिनची सुविधाही देण्यात आली आहे. गाडीची चार्जिंग संपल्यानंतर तुम्ही कार पेट्रोल किंवा डिझेल इंजिनवरही चालवू शकता.

  • हायब्रीड-इलेक्ट्रिक: ही कार प्रामुख्याने पेट्रोल किंवा डिझेल इंजिनवर चालते, परंतु त्यासोबत इलेक्ट्रिक बॅटरीची सुविधाही देण्यात आली आहे, ही कार रिजनरेटिव्ह ब्रेकिंगद्वारे चार्ज होते. या कारला बॅटरी प्लग इन करून चार्ज करावी लागत नाही.

Electric Car
Facebook Profile : 1 डिसेंबरपासून, तुमच्या Facebook प्रोफाइलवर 'हे' चार पर्याय दिसणार नाहीत

इलेक्ट्रिक कार कशी काम करते :

सर्व इलेक्ट्रिक वाहने (ज्याला बॅटरी इलेक्ट्रिक वाहने BEVs असेही म्हणतात) गाडीला विद्युत ऊर्जा साठवण्यासाठी बॅटरी पॅक वापरतात. वाहनाला विद्युत उर्जा स्त्रोतामध्ये प्लग करून बॅटरी चार्ज केली जात. सहाय्यक बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाच्या अॅक्सेसरीजला उर्जा देते. यामुळे गाडीची चाके फिरतात आणि गाडी पुढे जाऊ लागते. एडफेनर्जीनुसार, इलेक्ट्रिक कार पारंपारिक इंधन इंजिन (पेट्रोल किंवा डिझेल) असलेल्या वाहनांपेक्षा वेगाने धावतात. त्यामुळे इलेक्ट्रिक कार चालवायला हलक्या वाटतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com