घरासाठी नवीन TV घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New TV Buying Guide

घरासाठी नवीन TV घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या

New TV Buying Guide : स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यापूर्वी फक्त स्क्रीनचा आकार जाणून घेणे पुरेसे नाही. बाजारात अनेक प्रकारचे आणि रेंजचे टीव्ही उपलब्ध आहेत. तसेच दररोज टीव्ही अपग्रेड होत आहेत. तंत्रज्ञानात दररोज काहीतरी नवीन बदल होत आहेत, त्यामुळे चांगले फीचर्स असणारा, तसेच तुमच्या बजेटमध्ये येईल असा टीव्ही निवडणे थोडे कठीण जाते. त्यामुळे तुम्ही नवीन टिव्ही खरेदी करताना काही मूलभूत गोष्टींची काळजी घेतली तरी तुम्हाला फरफेक्ट टिव्ही निवडणे सोपे जाईल.

1. स्क्रीनचा आकार

तुमच्या घराच्या आणि खोलीच्या आकारानुसार टीव्ही घ्या. त्याचा आकार फार मोठा किंवा लहानही नसावा़. परफेक्ट टीव्हीचा आकार शोधण्याचा एक सोपा मार्ग देखील आहे. यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी बसून टीव्ही पाहता त्या ठिकाणापासून टीव्हीचे अंतर इंचांनी मोजा, ​​त्यानंतर त्याला 3 ने भागा. आता जेवढे अंतर मिळेल तेवढ्या आकाराचा टीव्ही तुम्ही घेऊ शकता. दुसरीकडे, जर तुम्ही 4k अल्ट्रा HD टीव्ही घेत असाल, तर तुम्हाला टीव्हीचे अंतर 1.5 ने भागावे लागेल.

2. रिफ्रेश रेट

टीव्हीमध्ये, तुम्हाला अनेकदा 60hz, 100hz सारखे शब्द ऐकायला मिळतील. हा हर्ट्झ रेट म्हणजे तुमचा टीव्ही एका सेकंदात किती वेळा रिफ्रेश होतो. हा रिफ्रेश रेट जितका जास्त असेल तितका टिव्ही पाहण्याचा चांगला अनुभव तुम्हाला मिळेल. मोबाईलवरून जुन्या टीव्हीवर स्क्रीन रेकॉर्ड करताना कॅमेरावर येणाऱ्या रेषा तुम्ही पाहिल्या असतील. हे केवळ कमी रिफ्रेश रेटमुळे होते

हेही वाचा: Apple सीईओची 2021 मधील कमाई माहितेय? वाचून तुमचे डोळे विस्फारतील!

3. HDMI कनेक्शन

जर तुम्ही स्मार्ट टीव्ही घेत असाल आणि तुम्हाला त्यात गेम वगैरे खेळायचे असतील तर HDMI पोर्टचे किती स्लॉट दिले आहेत ते नक्की पहा. कारण वेगवेगळे डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला टीव्हीमध्ये जास्त पोर्ट्सची आवश्यकता पडेल.

4. साधा टीव्ही Vs स्मार्ट टीव्ही

आजकाल प्रत्येक घरात वायफाय कनेक्शन असते, याशिवाय जवळपास प्रत्येकजण इंटरनेट पॅक वापरतो. अशा परिस्थितीत स्मार्ट टीव्ही घेणे हा एक चांगला पर्याय ठरतो कारण तुम्हाला एकाच ठिकाणी इंटरनेट आणि टीव्ही दोन्हीचा एक्सेस मिळतो. यामध्ये तुम्ही यूट्यूब, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम सारख्या प्लॅटफॉर्मचा लाभ देखील थेट टीव्हीवर घेऊ शकता.

हेही वाचा: Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology
loading image
go to top