
Guide to Detecting Dark Web Email Breaches and Ensuring Safety
esakal
डार्क वेब हा इंटरनेटचा गुप्त भाग आहे
जिथे हॅकर्स बेकायदेशीर कामे करतात.
गुगलच्या ‘डार्क वेब रिपोर्ट’ फीचरद्वारे तुमचा ईमेल सुरक्षित आहे का ते तपासा.
आजच्या डिजिटल युगात इंटरनेट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ऑनलाइन शॉपिंगपासून ते माहिती शोधण्यापर्यंत, स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय काहीच शक्य नाही. पण या सुविधेसोबतच एक धोका देखील आहे डार्क वेब. दररोज फसवणूक आणि घोटाळ्यांच्या घटना समोर येत आहेत. हॅकर्स वैयक्तिक माहिती चोरून आर्थिक नुकसान करतात. जर तुमचा ईमेल किंवा डेटा डार्क वेबवर पोहोचला तर तुम्हीही या फसवणुकीचे बळी ठरू शकता.