
डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांकडून वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका वाढला आहे.
तुमचा पासवर्ड लीक झाला आहे असे वाटत असल्यास चिंता करू नका
आम्ही दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पासवर्ड रीकवर करू शकता
आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार प्रत्येक क्षणी तुमच्या वैयक्तिक माहितीवर डोळा ठेवून असतात. ईमेल, पासवर्ड किंवा अन्य कोणती संवेदनशील माहिती लीक झाल्यास तुम्हाला आर्थिक फसवणूक, ओळख चोरी होणे यासारख्या गंभीर धोक्यांना सामोरे जावे लागू शकते. पण काळजी करू नका. तुमचा पासवर्ड लीक झाला आहे की नाही, हे तपासणे आता एकदम सोपे झाले आहे.