

How to do Ayushman Bharat Scheme E-KYC
esakal
देशातील लाखो गरीब कुटुंबांसाठी आयुष्मान भारत योजना ही जीवनवाहिनी ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळतात. रुग्णालयात दाखल होणे, शस्त्रक्रिया किंवा महागडे औषधोपचार सर्व काही मोफत मिळते. पण आता एक धोक्याची घंटा वाजली आहे. सरकारने नवे नियम आणले असून आयुष्मान कार्डधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास कार्ड रद्द होऊ शकते. याचा थेट परिणाम तुमच्या मोफत उपचारांवर होईल. रुग्णालय उपचार नाकारू शकते किंवा नाव यादीतून काढले जाईल. लाखो लाभार्थी अडचणीत येऊ शकतात