Instagram Tips : इन्स्टाग्राम आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाचा सोबत झाला आहे. वेगवेगळे रील्स पाहणे,बनवणे आणि व्हायरल होते लोकांना खूप आवडू लागले आहे. अश्यात इन्स्टाग्रामवर रील्स बघताना एखादी रील आवडली आणि आताती डाउनलोड करायची आहे. परंतु थर्ड पार्टी अॅप वापरण्याची इच्छा नाही? मग टेंशन कशाला? थेट इन्स्टाग्रामवरुन रील्स डाउनलोड करण्यासाठी सोपी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
इन्स्टाग्रामवर रील्स ही जबरदस्त सुविधा आहे जिथे तुम्ही छोटे व्हिडीओ बनवू शकता, पाहू शकता आणि शेअर करू शकता. हे व्हिडीओ मनोरंजक, आकर्षक आणि माहितीपूर्ण देखील असू शकतात. तुम्ही ही रील्स तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबियाना शेअर करू शकता किंवा इन्स्टाग्रामच्या बुकमार्क फोल्डरमध्ये सेव्ह करू शकता. पण, थेट डाउनलोड करण्याचा पर्याय नाही.
काही लोक थर्ड पार्टी अॅप वापरुन रील्स डाउनलोड करतात. पण या अॅप विश्वासार्ह नसून तुमच्या फोनच्या सुरक्षतेसाठी धोकादायक ठरू शकतात. मग रील्स सुरक्षितपणे कशी डाउनलोड करायची? तर इन्स्टाग्रामवरुन थेट डाउनलोड करण्यासाठी काही सोप्या ट्रिक आहेत.
स्टोरीमध्ये अॅड करा आणि मग जतन करा.
इन्स्टाग्राम उघडा आणि डाउनलोड करायची रील्स शोधा.
स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या 'शेअर' बटणवर टॅप करा.
खाली स्क्रोल करा आणि 'स्टोरीमध्ये जोडा' निवडा.
आता व्हिडीओ तुमच्या स्टोरीमध्ये बसवून घ्या.
टॉप राइटला असलेल्या 'थ्री-डॉट' बटणवर टॅप करा आणि 'सेव्ह' निवडा.
रील्स आता तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये जतन होईल.
जर रील्स डाउनलोड करायची नसून फक्त नंतर पाहण्यासाठी जतन करायची असेल तर 'बुकमार्क' पर्याय वापरा.
रील्स उघडा आणि स्क्रीनच्या टॉप राइटला असलेल्या 'थ्री-डॉट' बटणवर टॅप करा. 'सेव्ह' निवडा.
तुमच्या प्रोफाइलवर जा आणि टॉप राइटला असलेल्या 'हॅम्बर्गर मेन्यू' (तीन आडव्या रेषा) वर टॅप करा.
'Saved' निवडा आणि तेथे तुमच्या जतन केलेल्या रील्स दिसतील.
आता रील्सचा मजा घ्या आणि थर्ड पार्टी app पासून दूर रहा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.