esakal
विज्ञान-तंत्र
PG Portal : सरकारी ऑफिसमध्ये फेऱ्या मारून वैतागलाय? घरबसल्या 'इथे' करा कोणत्याही विभागाची तक्रार; थेट पंतप्रधान कार्यालयात पोहोचेल तुमचं म्हणणं
घरबसल्या फक्त एक क्लिकने सरकारी विभागांविरुद्ध तक्रार दाखल करा आणि ती थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवा.
सामान्य माणसाचे रोजचे प्रश्न खूप असतात. रेशन कार्ड मिळत नाही, वीज बिलात चुका, पोलिस स्टेशनमध्ये FIR नोंदवायला टाळाटाळ, सरकारी योजनांचे फायदे मिळत नाहीत किंवा एखाद्या अधिकाऱ्याने वागणूक वाईट दिली...अशा अनेक गोष्टींमुळे लोक हैराण होतात. पूर्वी तर कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत, फाइल अडकते, अधिकारी भेटत नाहीत, कागदपत्रे पुन्हा पुन्हा मागितली जातात. अनेकजण निराश होऊन गप्प बसतात. पण आता हे सगळे बदलले आहे

