

esakal
सायबर वर्ल्डमध्ये तुमचा मोबाईल हा तुमचा सर्वात जवळचा मित्र आहे, पण तोच तुमचा शत्रूही बनू शकतो..कल्पना करा, तुम्ही घरी बसलात, ऑफिसमध्ये आहात किंवा फिरायला गेलात पण तुमचे लोकेशन सतत कोणीतरी ट्रॅक करतंय. होय, अनेक अॅप्स तुमचे लोकेशन चोरतात आणि तुम्हाला कळतही नाही. डेटा चोरी, जाहिरातींचा भडीमार किंवा अगदी हॅकिंगचा धोका ही गोपनीयतेची मोठी समस्या आहे. पण काळजी नका.. आता तुम्ही स्वतः शोधू शकता कोणते अॅप ट्रॅक करतेय आणि ते लगेच बंद करू शकता. अँड्रॉइड किंवा आयओएस असो, दोन्ही फोनमध्ये सोपे नियंत्रणे आहेत.