
iPhone Heating Problem reasons and solutions
esakal
आजकाल आयफोन हा प्रत्येकाच्या हातातल्या गरजेपेक्षा जास्त फॅशन बनला आहे. एकंदरीत हा मोबाइल चांगला आहे. कारण आहे शक्तिशाली प्रोसेसर, आकर्षक डिस्प्ले आणि 5G कनेक्टिव्हिटी यामुळे तो लोकप्रिय आहे. पण हल्ली अनेक वापरकर्त्यांना त्यांच्या आयफोनच्या गरम होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतोय. गेमिंग, चार्जिंग किंवा एकाच वेळी अनेक अॅप्स वापरण्यामुळे ही समस्या उद्भवते. सततचा गरमपणा बॅटरी आणि कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतो. चला तर मग याची पाच प्रमुख कारणे आणि आयफोन थंड ठेवण्यासाठी सोपे उपाय जाणून घेऊया.