
आधार कार्ड (Aadhaar Card) हे भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. सरकारी काम असो की खाजगी, सगळीकडे याची गरज पडते. बहुतेक लोक ते नेहमी त्यांच्या पर्समध्ये ठेवतात. मात्र पेपर असल्याने तो कट होऊन पावसात भिजून किंवा अन्य कारणाने खराब होण्याची भीती आहे. तुम्हालाही अशा प्रकारची अडचण आली असेल, तर आधार पीव्हीसी कार्ड (Aadhaar PVC Card) घेऊन तुम्ही ही समस्या सोडवू शकता. हे प्लास्टिक असल्याने खराब होत नाही. Aadhaar PVC Card हे काही नवीन गोष्ट नसली तरी आता तुम्ही फक्त एक मोबाईल नंबर वापरून संपूर्ण कुटुंबासाठी ते ऑर्डर करू शकता.
UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की तुमच्या Aadhaar शी लिंक मोबाइल क्रमांकाची पर्वा न करता, तुम्ही OTP मिळवण्यासाठी किंवा authentication साठी कोणताही मोबाइल नंबर वापरून संपुर्ण कुटुंबाचे Aadhaar PVC Card ऑर्डर करु शकता.
तुमच्या आधारकारशी रजीसिटर्ड मोबाइल नंबर काहीही असले तरीही, authentication, ओटीपी मिळवण्यासाठी तुम्ही कोणताही मोबाइल नंबर वापरू शकता. एक व्यक्ती संपूर्ण कुटुंबासाठी आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकते.
तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की, आधार PVC कार्डमध्ये डिजिटल स्वाक्षरी केलेला सुरक्षित QR कोड आहे, ज्यामध्ये अनेक सुरक्षा फीचर्ससह फोटो आणि डेमोग्राफिक डिटेल्सचा समावेश आहे. मात्र, ते फ्री येत नाही, पीव्हीसी कार्डसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला नाममात्र रक्कम म्हणून 50 रुपये द्यावे लागतील.
आधार क्रमांक, व्हर्च्युअल आयडी किंवा एनरोलमेंट आयडी वापरून uidai.gov.in किंवा Resident.uidai.gov.in वर कार्ड ऑनलाइन ऑर्डर केले जाऊ शकते. आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाइन कसे मिळवायचे याची प्रोसेस खाली देण्यात आलेली आहे.
ऑर्डर करण्यासाठी…
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा https://uidai.gov.in टाइप करा .
'Order Aadhaar PVC Card' सर्व्हिसेवर टॅप करा आणि तुमचा 12 अंकी यूनिक आधार क्रमांक (UID) किंवा 28 अंकी इनरोलमेंट नंबर एंटर करा.
सुरक्षा कोड एंटर करा आणि My Mobile Number is not Registered नंतर चेक बॉक्सवर क्लिक करा
नॉन-रजिस्टर्ड/अल्टरनेट मोबाइल नंबर एंटर करा. त्यानंतर 'Send OTP' वर क्लिक करा .
'Terms and Conditions' च्या पुढील चेक बॉक्सवर क्लिक करा .
OTP व्हेरिफिकेशन पूर्ण करण्यासाठी 'Submit' ऑप्शन क्लिक करा .
नंतर 'Make payment' वर क्लिक करा. तुम्हाला क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI सारख्या पेमेंट ऑप्शन्स पेमेंट गेटवे पेजवर रिडायरेक्ट केले जाईल.
पेमेंट केल्यानंतर, डिजिटल सिग्नेचर असलेली एक पावती तयार केली जाईल जी पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकतात. एसएमएसद्वारे सर्विस रिक्वेस्ट नंबर देखील मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.