Email Phishing : चुकीच्या ईमेलवर एक क्लिक अन्..बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं; जाणून घ्या काय आहे हा स्कॅम

Email Scam : ई-मेल वरून फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये या वर्षात झालीये वाढ
Phishing Emails: Detection Tips and Protection Measures
Phishing Emails: Detection Tips and Protection Measuresesakal

Cyber Crime : आजकाल सायबर क्राईमच्या अनेक घटनांबद्दल आपण ऐकत असतो. अटॅकर्स वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची फसवणूक करून त्यांना गंडा घालू शकतात.अश्यात सायबर क्राईममध्ये ई-मेल वरून फसवणूक करण्याचा प्रकार जरा जास्तच वाढला आहे.हा एक प्रकारचा नवीन घोटाळा आहे, या घोटाळ्यापासून तुम्ही स्वतःला आणि तुमच्या लोकांना कसे वाचवाल. त्याचे तपशील पुढे जाणून घ्या. 

ईमेल फिशिंग काय आहे?

ईमेल फिशिंग हा एक प्रकारचा सायबर गुन्हा आहे ज्यामध्ये गुन्हेगार बळींची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांची वैयक्तिक माहिती, क्रेडिट कार्ड माहिती किंवा बँक खाते माहिती चोरण्यासाठी बनावट ईमेल पाठवतात.

Phishing Emails: Detection Tips and Protection Measures
Cyber Crime: इंस्टाग्रामवर एक क्लिक अन् महिलेने गमावले 2.7 कोटी रुपये; काय आहे प्रकरण?

ईमेल फिशिंग कसा ओळखायच?

  • तुम्हाला एखाद्या कंपनी किंवा संस्थेकडून ईमेल आला असेल ज्याच्याशी तुम्ही व्यवहार केला नाही, तर सावध रहा.

  • ईमेलमध्ये तुमचे नाव, खाते क्रमांक किंवा इतर वैयक्तिक माहिती नसेल तर ते संशयास्पद आहे.

  • फिशिंग ईमेलमध्ये अनेकदा व्याकरण किंवा स्पेलिंगमध्ये त्रुटी असतात.

  • तुम्हाला तात्काळ कृती करण्यास सांगणारे ईमेल संशयास्पद आहेत.

  • ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याचा URL चांगल्या प्रकारे तपासा.

  • अनोळखी व्यक्तीकडून आलेले ईमेल अटॅचमेंट कधीही डाउनलोड करू नका.

Phishing Emails: Detection Tips and Protection Measures
Microsoft Copilot in Telegram : टेलिग्रामला मिळाला 'एआय'चा टच, AI वापरून मिळणार प्रवासाच्या टिप्स, स्पोर्ट्स अपडेट्स

ईमेल फिशिंग घोटाळ्यांपासून बचाव कसा करायचा?

तुमचे ईमेल आणि पासवर्ड मजबूत ठेवा. कठीण आणि युनिक पासवर्ड वापरा आणि ते कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका.

तुमच्या संगणकावर आणि मोबाइल डिव्हाइसवर अँटी-फिशिंग सॉफ्टवेअर इंस्टॉल करा.

ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याचा URL चांगल्या प्रकारे तपासा.

कोणत्याही ईमेलमध्ये तुमची वैयक्तिक माहिती, क्रेडिट कार्ड माहिती किंवा बँक खाते माहिती शेयर करण्यापूर्वी विचार करा. तुम्हाला एखादा संशयास्पद ईमेल मिळाल्यास, संबंधित सायबर संस्थेला तक्रार करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com