esakal | जिओ पोस्टपेड वरून जिओ प्रीपेडवर कसे जायचे, सोपा मार्ग जाणून घ्या

बोलून बातमी शोधा

jio
जिओ पोस्टपेड वरून जिओ प्रीपेडवर कसे जायचे, सोपा मार्ग जाणून घ्या
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

रिलायन्स जिओने जिओ प्रीपेड आणि जिओ पोस्टपेड या दोन्ही सेवा भारतात उपलब्ध करुन दिल्या आहेत. जिओ 2016 पासून मोठ्या दूरसंचार क्षेत्रात मोठ्या जोशात उदयास आला आहे, मात्र भारतीय बाजारामध्ये जिओला आव्हान देणारे अनेक प्रतिस्पर्धी देखील आहेत. जिओला एअरटेल, व्होडाफोन आयडिया बीएसएनएल आणि इतर अनेक कंपन्यांकडून कडवी स्पर्धा मिळते. जिओने अलीकडेच आपल्या पोस्टपेड प्लॅन्समध्ये काही बदल केले आहेत आणि आता कंपनीच्या पोस्टपेड प्लॅनची ​​प्रारंभिक किंमत 199 रुपये झाली आहे. आता आपण जिओच्या पोस्टपेड योजना देखील अगदी कमी किंमतीत मिळवू शकता.

पोस्टपेडमध्ये एक समस्या आहे की आजकाल लोकांचे उत्पन्न खूप कमी आहे, आणि कोरोनाव्हायरस देखील वेगाने वाढत आहे, ज्यामुळे आता उत्पन्न आणखी कमी होत आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याचे पोस्टपेड बिल भरणे आपल्याला त्रासदायक वाटू शकते. अशा परिस्थितीत, दरमहा हे बिल भरण्याचा आपला खर्च थोडा कमी करयाचा असेल, तर आपण आपले पोस्टपेड जिओ कनेक्शन जिओ प्रीपेडवर करु शकता शकता. यासाठीचे सोप्या पध्दती आज आपण जाणून घेणार आहोत.असे करण्यासाठी दोन पर्याय आहेत, एक म्हणजे ऑनलाइन आणि दुसरा थेट स्टोरला भेट देऊन.

थेट पोस्टपेड वरून थेट प्रीपेडवर कसे स्विच करावे

  • हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की प्रीपेड प्लॅन हे एक्सपायरी तारखेसह येतात आणि जियोच्या ग्राहकांना वैधता संपताच पुन्हा रिचार्ज करावे लागेल. जिओची प्रीपेड योजना 10 रुपयांपासून सुरू होते. आणि या योजनांची वार्षिक वैधता 10 रुपयांपासून सुरू होते आणि त्यांची किंमत 4,999 रुपयांपर्यं जाते. Jio पोस्टपेड वरून प्रीपेडवर स्विच करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

  • सर्व प्रथम, आपल्याला Jio च्या वेबसाइटवर जावे लागेल , येथे आपल्याला आपले नाव आणि आपला नोंदणीकृत पोस्टपेड नंबर टाकावा लागेल.

  • आता तुम्हाला जनरेट ओटीपी वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर ओटीपी दाखल केल्यावर तुम्हाला व्हॅलिडेट ओटीपी वर क्लिक करावे लागेल.

  • आता आपल्याला येथे दिसत असलेल्या प्रीपेड पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि पोर्ट टू जियो वर क्लिक करावे लागेल.

  • येथे तुम्हाला तुमचा डिलिव्हरी पत्ता देखील भरावा लागेल, त्यानंतर तुम्हाला पोर्ट टू जिओ रिक्वेस्ट वर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर, एक जिओ प्रतिनिधी 3-4 दिवसात आपल्या घरी येईल, तो आपल्या कागदपत्रांची पडताळणी करेल. येथे आपणास आपले आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा वाहन चालविण्याचा परवाना विचारला जाऊ शकतो.

मात्र आपल्याला ही प्रक्रिया ऑनलाइन त्रासदायक वाटत असल्यास आपण ती सहजपणे ऑफलाइन देखील सहजपणे करू शकता, यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या कोणत्याही जिओ स्टोअरमध्ये जावे लागेल. परंतु ऑनलाइन पध्दतीचा वापर करून आपण आपले पोस्टपेड Jio कनेक्शन Jio प्रीपेडवर घेऊ शकता. कोरोनाव्हायरस वेगाने पसरत आहे म्हणून घरी रहा आणि सुरक्षित रहा.