
Whatsapp Call Recording Tips : व्हॉट्सअॅप हे जगभरातील ३.५ अब्जांहून अधिक वापरकर्त्यांसाठी आवश्यक ठरलेले मेसेजिंग अॅप आहे. केवळ चॅटिंगसाठीच नव्हे, तर व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंगसाठीही हे मोठ्या प्रमाणात वापरले जाते. अनेकांना वाटते की व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करता येत नाहीत, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही WhatsApp कॉल सहज रेकॉर्ड करू शकता.
व्हॉट्सअॅपमध्ये कॉल रेकॉर्डिंग फिचर नाही, त्यामुळे या कॉल्स पूर्णतः खाजगी असतील असे वाटते. मात्र, स्क्रीन रेकॉर्डिंगच्या मदतीने व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करता येतो.
तुमच्या फोनच्या स्क्रीन रेकॉर्डिंग फिचरचा वापर करा. बहुतेक स्मार्टफोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग फिचर असते, ज्याच्या मदतीने तुम्ही व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल दोन्ही रेकॉर्ड करू शकता.
WhatsApp कॉल सुरू करा.
स्क्रीन रेकॉर्डिंग फिचर ऑन करा.
रेकॉर्डिंग सुरू झाल्यावर कॉलमधील आवाज आणि व्हिडिओ दोन्ही रेकॉर्ड होतात.
कॉल संपल्यानंतर रेकॉर्डिंग आपोआप सेव्ह होते.
काही वेळा रेकॉर्डिंग थांबत नसेल, तर ते मॅन्युअली बंद करा.
हे व्हिडिओ गॅलरी किंवा फाइल मॅनेजरमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग फोल्डरमध्ये सेव्ह होते.
iPhone मध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग करताना फक्त व्हिडिओ रेकॉर्ड होतो, पण आवाज सेव्ह होत नाही. त्यामुळे iPhone युजर्ससाठी ही पद्धत उपयोगी ठरणार नाही.
काही देशांमध्ये, कोणाच्याही संमतीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे बेकायदेशीर असते. भारतासह काही देशांमध्ये गोपनीयता कायदे आहेत, त्यामुळे रेकॉर्डिंग करण्यापूर्वी समोरील व्यक्तीची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
महत्त्वाच्या संवादांचा रेफरन्स ठेवण्यासाठी उपयुक्त
सुरक्षेसाठी पुरावा म्हणून काम करू शकतो
ऑनलाइन इंटरव्ह्यू किंवा व्यावसायिक संभाषण सेव्ह करण्यासाठी उपयोगी
व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करायचा विचार करत असाल, तर ही पद्धत सहज आणि प्रभावी ठरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.