
Google Photos वरून फोटो, व्हिडीओ डिलीट झालेत? 'असे' करु शकता रिस्टोर
तुम्ही फोन विकत घेतल्यास, जवळपास सर्व फोनमध्ये Google Photos ॲप दिलेले असते किंवा तुम्ही ते Google Store वरून डाउनलोड करता. सध्या, बहुतेक लोक Google Photos ॲप वापरतात. Google Photos ॲप मोफत ऑनलाइन फोटो बॅकअप ठेवता येते. Google Photos वेब व्हर्जन वर देखील एक्सेस केले जाऊ शकतात, परंतु तुमचे फोटो तेथून डिलीट झाले असल्यास, तुम्ही ते डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ 60 दिवसांच्या आत रिस्टोर करू शकता. जर तुमचा फोटो डिलीट झाले असतील तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण आज आपण डिलीट झालेले फोटो रिस्टोर करण्याचा सोपा उपाय सांगणार आहोत…
वेब व्हर्जनमध्ये Google फोटो कसे रिस्टोर करावेत?
सर्वप्रथम, कंप्युटर किंवा लॅपटॉपवरील ब्राउझरमधील https://photos.google.com/ लिंकवर जाऊन वेबवर Google Photos उघडा.
या प्रक्रियेसाठी, प्रथम तुमच्या Google ID ने लॉग इन करा.
होमपेजवर जा आणि वरच्या डाव्या कोपर्यात हॅम्बर्गर चिन्हावर क्लिक करा.
त्यानंतर ट्रॅश ऑप्शन निवडा.
यानंतर, तुम्हाला परत हवे असलेले फोटो निवडा.
हे पूर्ण झाल्यानंतर वरच्या उजव्या बाजूला रिस्टोर बटणावर क्लिक करा.
या प्रोसेसनंतर तुम्ही तुमचे फोटो रिस्टोर केले जातील
हेही वाचा: ही इलेक्ट्रिक कार ठरतेय ग्राहकांची पसंत, एका चार्जमध्ये धावते 310km
अँड्रॉइड फोनमध्ये फोटो कसे रिस्टोर करायचे
अँड्रॉइड व्हर्जनमधील Google Photos मधून डिलिट केलेले फोटो परत मिळवण्यासाठी, प्रथम तुम्हाला Google Photos उघडावे लागेल.
यानंतर, वरच्या डाव्या कोपर्यात हॅम्बर्गर आयकॉनवर टॅप करा आणि त्यानंतर ट्रॅश ऑप्शन निवडावा लागेल.
नंतर दीर्घकाळ दाबून तुम्ही पुनर्संचयित करू इच्छित फोटो निवडा.
त्यानंतर Restore बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे डिलीट केलेले फोटो Restore करता येतात.
iOS डिव्हाइसमध्ये देखील, सर्व प्रथम, Google Photos उघडावे लागेल.
यानंतर, वरच्या डाव्या कोपर्यात हॅम्बर्गर आयकॉनवर टॅप करा.
त्यानंतर बिनचा ऑप्शन निवडावा लागेल.
वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट मेन्यूवर टॅप करा
त्यानंतर सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर फोटो निवडावा आणि काम पूर्ण झाल्यानंतर, फोटोना Restore केले जाऊ शकते. अशा प्रकारे आपण फोटो Restore करु शकाल.
हेही वाचा: रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण
Web Title: How To Restore Deleted Photos And Videos From Google Photos Know Easy Process Here
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..