esakal | पेन ड्राइव्हलाही ठेवता येतो पासवर्ड; माहित आहे कसा?

बोलून बातमी शोधा

pendrive
पेन ड्राइव्हलाही ठेवता येतो पासवर्ड; माहित आहे कसा?
sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्याच्या काळात स्मार्टफोन, लॅपटॉप या गरजेच्या वस्तूंपैकी झाल्या आहेत. कोणताही ऑनलाइन व्यवहार करायचा असेल तर ही अत्याधुनिक उपकरणं लागतात. त्यामुळे स्मार्टफोन, टॅबलेट, हार्ड डिस्क आणि पेनड्राइव्ह यामध्ये अनेकदा आपण आपली गोपनीय माहिती ठेवत असतो. त्यामुळे या सगळ्या गॅजेटला पासवर्ड ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. स्मार्टफोन, टॅबलेट या सारख्या वस्तूंना आपण पासवर्ड ठेऊ शकतो. त्याचसोबत पेन ड्राइव्हला पासवर्ड ठेवणंदेखील तितकंच गरजेचं आहे. मात्र, पेनड्राइव्हला पासवर्ड कसा ठेवावा हे फार कमी जणांना माहित असतं. त्यामुळे आज पेनड्राइव्हला पासवर्ड कसा ठेवायचा ते जाणून घेऊयात.

खरं तर पेन ड्राइव्हला पासवर्ड ठेवणं अत्यंत सोपं आहे. कारण, हे फिचर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये डिफॉल्ट देण्यात आलेलं असतं. फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्या की आपल्याला हा पासवर्ड सेट करता येतो.

हेही वाचा: कोरोनावर मात करणं सहज शक्य; डॉक्टरांनी सांगितला उपाय

असा सेट करा USB पेन ड्राइव्हचा पासवर्ड

१. सर्वात प्रथम USB पेन ड्राइव्ह आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपला अटॅच करा. त्यानंतर ड्राइव्हवर जाऊन राइट क्लिक करा.

२.राइट क्लिक केल्यावर तुमच्या समोर 'Turn on BitLocker' असा ऑप्शन येईल. तो सिलेक्ट करा.

३. त्यानंतर ‘Use password to protect the drive' वर क्लिक करा व तुम्हा हवा तो पासवर्ड सेव्ह करा.

४.पासवर्ड ठेवतांना तो शक्यतो किचकट व गुंतागुंतीचा ठेवा जेणेकरुन कोणीही तुमचा पेन ड्राइव्ह घेतल्यावर किंवा चोरल्यावर तो ओपन करु शकणार नाही.