YouTube Earning : हॉबीला द्या बिझनेसचं रूप! यूट्यूबवर गेमिंग चॅनल बनवून कमावू शकता लाखो रुपये..

YouTube Gaming Channel : तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी नियमित व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे.
YouTube Gaming Channel
YouTube Gaming ChanneleSakal

How to earn from YouTube Channel : सध्या तरुणांमध्ये ऑनलाईन गेमिंगचं प्रमाण वाढलं आहे. कित्येक मोबाईल कंपन्या स्वस्तात गेमिंग स्मार्टफोन लाँच करत आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांकडे गेमिंगसाठी साधन उपलब्ध होत आहे. गेमिंगची सवय लागल्यामुळे बऱ्याच जणांचं नुकसान होत असल्याची टीका सतत होत असते. मात्र, या माध्यमातून तुम्ही पैसे देखील कमावू शकता.

यूट्यूबवर एक गेमिंग चॅनल उघडून तुम्ही पैसे कमावणं सुरू करू शकता. सध्या गेमिंग चॅनल्स हे मोठ्या प्रमाणात ग्रो करत आहेत. तुम्हाला जी गेम आवडते, त्या गेमला डेडिकेटेड चॅनल तुम्ही सुरू करू शकता. एकापेक्षा अधिक गेम्स खेळत असाल तर त्यासाठीही विशेष चॅनल सुरू करू शकता. (How to Start Gaming Channel on YouTube)

YouTube Gaming Channel
Online Gaming Safety Tips : ऑनलाईन गेमर्सना केंद्राने दिला गंभीर इशारा, सुरक्षेसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स!

यूट्यूबचा क्रायटेरिया

  • यूट्यूबवर चॅनल सुरू केल्यानंतर पैसे कमावण्यासाठी ते मॉनिटाईज (YouTube Monetization) करणं गरजेचं आहे.

  • सध्याच्या पॉलिसीनुसार मॉनिटायझेशन प्रक्रिया (Monetization process) सुरू करण्यासाठी कमीत कमी 1,000 सबस्क्राईबर्स असणं गरजेचं आहे.

  • गेल्या एका वर्षात 4,000 तासांपेक्षा अधिक वॉचटाईम कम्प्लीट होणं गरजेचं आहे. (Monetization Criteria)

  • चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर अर्निंग प्रक्रिया सुरू होते.

या गोष्टी लक्षात घ्या..

  • तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी नियमित व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे. (YouTube Gaming Channel)

  • व्हिडिओंची क्वालिटी, गेमिंग डेस्क अशा गोष्टी फार भारीतल्या असाव्यात असं नाही. मात्र, पहायला चांगलं वाटेल असा सेटअप (Gaming Setup) नक्कीच असावा.

  • गेमिंग व्यतिरिक्त तुम्ही इतर प्रकारच्या व्हिडिओंसाठी देखील चॅनल (Gaming Channel) तयार करू शकता. मात्र, सध्या यूट्यूब गेमिंग चॅनल्सना इतर तुलनेत अधिक पैसे देत आहे.

  • चॅनल ग्रो करण्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात शॉर्ट्स देखील अपलोड करू शकता.

YouTube Gaming Channel
Gaming Industry : गेमिंग क्षेत्राकडून १४ हजार कोटी ‘जीएसटी’; दरवाढीमुळे पुढील वर्षात अधिक करमहसुलाची अपेक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com