Google Safety Tips : अलर्ट! मोबाईल मधलं गुगल तुमच्या गप्पा ऐकतंय, डेटा लिक होण्याआधी बंद करा 'ही' 1 सेटिंग, नाहीतर होणार मोठं नुकसान

Google Microphone Safety Tips : गुगल तुमच्या मायक्रोफोनमधून तुमचे बोलणे ऐकत असते. तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी काही सेटिंग्ज बदलाव्या लागतात. त्या कश्या बदलायच्या जाणून घ्या.
Google Microphone Safety Tips
Google Microphone Safety Tipsesakal
Updated on

ऑनलाइन गोपनीयतेबद्दल वाढती काळजी आणि धोके लक्षात घेतल्यास, आपल्या डेटावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या स्मार्टफोनवरील काही सोपे सेटिंग्ज बदलून तुम्ही गुगलला तुमचा मायक्रोफोन वापरण्यापासून थांबवू शकता, ज्यामुळे टार्गेटेड अ‍ॅडव्हर्टायझिंगसाठी तुमचा डेटा वापरला जातो.

तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का की एखाद्या उत्पादनावर किंवा विशिष्ट विषयावर गप्पा मारल्यावर, तुमच्या फोनवर त्याच्याशी संबंधित जाहिराती दिसायला लागतात? जर हे तुमच्यासोबत घडलं असेल, तर ते एक संयोग नाही. अनेक Android वापरकर्ते अनवधानाने गुगलला त्यांचे मायक्रोफोन, लोकेशन आणि इतर वैयक्तिक डेटा वापरण्याची परवानगी देतात, ज्यामुळे गुगल तुमच्या गप्पा ऐकू शकतो आणि त्या माहितीचा वापर जाहिरातींसाठी केला जातो. तुमच्या खाजगी गप्पा गुगलपर्यंत पोहोचू नयेत यासाठी योग्य खबरदारी घेतली पाहिजे.

Google Microphone Safety Tips
Maruti Suzuki Alto Weight : लॉर्ड अल्टो झाली झिरो फिगर, मारुतीने 100 किलोने वजन केले कमी, नवा लुक अन् नवी किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

गुगल तुमच्या गप्पा कशाप्रकारे ऐकू शकतो?

प्रत्येक Android फोनवर गुगलच्या सेवा वापरण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचा गुगल अकाऊंट साइन इन करावा लागतो. अनेकदा, अ‍ॅप्स इंस्टॉल करतांना वापरकर्ते कॅमेरा, कॉनटॅक्ट, लोकेशन, आणि मायक्रोफोन यांसारख्या परवानग्या देते, त्याबद्दल विचार न करता.

गुगलच्या सेवा डिफॉल्टने चालू असतात, ज्यामुळे ते तुमचा डेटा गोळा करू शकते. तुमच्या फोनचा मायक्रोफोन अ‍ॅक्सेस केला जातो, ज्यामुळे गुगल तुमचं ऐकतं. हे गोळा केलेलं डेटा सहसा व्यक्तिमत्वानुसार जाहिराती दाखवण्यासाठी वापरलं जातं.

Google Microphone Safety Tips
OnePlus 13T Launch : लवकरच लाँच होणार OnePlus 13T मोबाईल; आयफोनला टक्कर देणारे फीचर्स, किंमत फक्त...

मायक्रोफोन अ‍ॅक्सेस थांबवण्यासाठी काय करावे?

गुगलला तुमच्या फोनमधून ऑडिओ रेकॉर्ड करायला थांबवण्यासाठी खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करा.

  1. आपल्या Android स्मार्टफोनवरील सेटिंग्ज ओपन करा.

  2. स्क्रोल करून "Google Settings" वर टॅप करा.

  3. "Manage Your Google Account" वर टॅप करा.

  4. "Data & Privacy" सेक्शनमध्ये जा.

  5. "Web & App Activity" शोधा आणि त्यावर टॅप करा.

  6. "Subsettings" खाली "Include Audio and Video Activity" शोधा.

  7. या पर्यायाला अनचेक करा आणि गुगलच्या Terms of Service ओके करा.

Google Microphone Safety Tips
Instagram and Facebook Down: इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाऊन; तुम्हालाही येतेय का 'ही' अडचण? नेटकऱ्यांमध्ये निराशा

हे सेटिंग्ज बदलल्यानंतर काय होईल?

  • गुगलला तुमच्या मायक्रोफोनचा अ‍ॅक्सेस मिळणार नाही, त्यामुळे तुमच्या खाजगी गप्पा सुरक्षित राहतील.

  • तुम्हाला तुमच्या बोलण्याशी संबंधित जाहिराती दिसणं थांबेल.

  • तुमचा डेटा सुरक्षित राहील आणि अनावश्यक ट्रॅकिंग व संभाव्य गैरवापर कमी होईल.

गुगलला तुमच्या गप्पा ऐकू देणं बंद करण्यासाठी हे सोपं आणि प्रभावी उपाय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com