Instagram and Facebook Down: इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाऊन; तुम्हालाही येतेय का 'ही' अडचण? नेटकऱ्यांमध्ये निराशा
Instagram and Facebook News: एक मोठी बातमी समोर आली आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाऊन झाल्याचे दिसून आले आहे. या विरोधात अनेक युझर्सनी तक्रारी दाखल केल्या आहेत.
टेक कंपनी मेटाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आउटेजच्या तक्रारी येत आहेत. जगभरातील अनेक फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांना वेब आणि अॅप दोन्ही आवृत्त्यांवर फीड अॅक्सेस करण्यात आणि रिफ्रेश करण्यात समस्या येत आहेत.