How to stop Spam Calls : स्पॅम कॉल्समुळे तुम्हीही त्रस्त आहात का? मग फॉलो करा 'या' टीप्स l how to stop spam calls know easy tricks | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

How to stop Spam Calls

How to Stop Spam Calls : स्पॅम कॉल्समुळे तुम्हीही त्रस्त आहात का? मग फॉलो करा 'या' टीप्स

How to stop Spam Calls : भलत्या वेळी आलेल्या स्पॅप कॉल्समुळे अनेक युजर त्रस्त झाले आहेत. तुम्हालाही याचा अनुभव कधी तरी आला असेल. हे कॉल्स कोणत्याही बँकेतून किंवा कंपनीतून येतात. आवश्यक कामांवेळीच असे कॉल येत असतात. त्यामुळे अनेकांना मनस्ताप होतो.

अनेकांकडून हे कॉल्स ब्लॉक केले जात नाही कारण बऱ्याच लोकांना याची योग्य पद्धत माहिती नाही. जर तुमच्याकडे अँड्रॉयड स्मार्टफोन असेल तर तुम्ही स्पॅम कॉलला अवघ्या काही मिनिटात ब्लॉक करू शकता. जाणून घ्या कसं तुम्ही spam calls ब्लॉक करू शकता.

कोणता कॉल स्पॅम कॉल आहे हे कसं ओळखाल?

कोणता कॉल स्पॅम आहे हे पाहण्यासाठी Android आणि iOS डिव्हाइसमध्ये पर्याय उपलब्ध आहे. तसेच, त्यांना ब्लॉक करण्याची परवानगी देखील आहे. Google चे फोन अॅप आजकाल बहुतेक Android स्मार्टफोन्सवर डीफॉल्ट कॉलिंग अॅप म्हणून येते. बजेट असो, मिड-रेंज किंवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, स्पॅम कॉल्सचा अनुभव सारखाच असतो. हे कॉल कमी करण्यासाठी आज काही भन्नाट टिप्स शेयर करणार आहो.

वापरा या टीप्स

  • सर्वात आधी गुगल फोन ओपन करा. टॉप राइट कॉर्नरमध्ये मेन्यू आयकॉनवर टॅप करा.

  • या ठिकाणी तुम्हाला सेटिंग्सच्या ऑप्शन वर टॅप करावे लागेल.

  • सेटिंग्स मेन्यूमध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. परंतु, या ठिकाणी Caller ID and Spam फीचर शोधावे लागेल.

  • यावर टॅप केल्यानंतर तुमच्या समोर तीन ऑप्शन येतील. पहिला ऑप्शन enabled by default आहे. जो फोन कॉल मिळवल्यानंतर स्क्रीनवर कॉलर आणि स्पॅम आयडी दिसेल.

  • पुढील Filter Spam Calls आहे. या ऑप्शनला इनेबल केल्यानंतर संशयित स्पॅम कॉल्स तुम्हाला परेशान करणार नाहीत.

  • हे अॅप फक्त त्याच कॉलर्सला स्पॅमच्या रूपात मानतो. ज्याला अन्य गुगल डायलर यूजर्सकडून स्पॅम चिन्ह मिळाले आहे.  (mobile Phone)

कॉलर आयडी आणि स्पॅम सेक्युरीटी

  • यासाठी तुम्ही प्रथम तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर फोन अॅप उघडा. यानंतर तुम्हाला More पर्यायावर क्लिक करावे लागेल.

  • आता सेटिंग्ज बटणावर टॅप केल्यानंतर, तुम्हाला येथे स्पॅम आणि कॉल स्क्रीन पर्याय दिसेल.

  • तुम्ही तुमच्या फोनवर टॅप करताच स्पॅम कॉल ब्लॉक केले जातील.

  • विशेष म्हणजे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे फीचर्स डिसेबल करू शकता. 

टॅग्स :Technology