Spam Call Blocker : या सेटिंगने करा स्पॅम कॉलला कायमचे बाय बाय

Spam Call Blocker
Spam Call Blocker esakal

Spam Call Blocker : दिवसेंदिवस सायबर क्राईम (Cyber Crime) वाढत आहे. कोरोनानंतर या सायबर गुन्ह्यांमध्ये 500 पटीने वाढ झाली आहे. वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन लोकांना फोन करुन हे ठगबाज बँकेच्या अकांऊंटमधील रकमेवर डल्ला मारतात. नुकतेच हरियाणामध्ये पोलिसांनी अशा ठगबाजांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 28 हजार Spam Numbers चा शोध घेतला आहे. हे सर्व नंबर या ठगबाजांनी विविध सायबर गुन्ह्यांसाठी वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

यासह फरिदाबाद येथेही अशा सायबर ठगांनी कंपनीचे एक्झिक्यूटीव किंवा सर्विसच्या नावाने अनेकांना फोन करुन गंडे घातले. यासह अशाप्रकारच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. तुम्हाला या सर्वप्रकारत स्वतःची फसवणूक होऊ द्यायची नसेल आणि आपल्या कष्टाची कमाई सुखरुप ठेवायची असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

Spam Call Blocker
BSNL : बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये मिळेल 1000GB डेटा; किंमत अतिशय कमी

सायबर गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी या चुका टाळा

सायबर गुन्हेगार म्हणजेच फ्रॉडस्टर्स लोकांना लुटण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात. यात प्रामुख्याने लोकांच्या मनात भिती उत्पन्न करणे हे त्यांचे ध्येय असते. तुमचे बँक अकाऊंट, क्रेडीट कार्ड ब्लॉक झाले आहे. तुम्ही पैसे काढू शकत नाही. तुम्हाला तुमचे अकाऊंट, क्रेडीट कार्ड होऊ द्यायचे नसेल तर आम्हाल विचारतो ती माहिती पुरवा. म्हणजे तुमचे व्यवहार पुर्ववत होतील. अशाप्रकारचे फोन लोकांना करतात. लक्षात ठेवा कुठलीही बँक अशी माहिती विचारण्यासाठी ग्राहकांना फोन करत नाही.

Spam Call Blocker
Smartphone Handling Tips: 'या' 5 चुका तुमचा स्मार्टफोन करेल डॅमेज, तुम्ही या चुका करत नाही ना?

असा फोन आल्यास ही काळजी घ्या

* आपल्या फोनवर बँक किंवा कोणतीही महत्त्वपुर्ण माहिती विचारणारा फोन आल्यास घाबरुन जाऊन नका.

* त्यांनी कितीही वेळा सांगितले कि तुमचे व्यवहार बंद पडतील, नुकसान होईल. तरी त्यांना कुठलीही माहिती देऊ नका. त्यांना माहिती दिल्यास नुकसान 100 टक्के होईल.

* आपल्या बँकिंग यासह सर्व अकाऊंट्सला ट्रू- फॅक्टर सेटिंग नेहमी सुरु ठेवा. यामुळे दुसरं कोणी तुमच्या अकाऊंटला हॅक करु शकत नाही.

* आपल्या मोबाईलवर आलेला OTP, ATM, Credit कार्डवर असलेला CVV, CVC कोड कधीही कोणालाच शेअर करु नका.

* सध्या ई- कॉमर्स माध्यमातून घरी सामान येतो त्यावेळीही OTP येतो.

Spam Call Blocker
Govt New Rule: सोशल मीडिया कंपन्यांची मनमानी थांबणार; शासनाकडून आयटी नियमांत मोठे बदल

Spam Calls करता येतात ऑटोमॅटीक ब्लॉक

आपण अँड्रॉईड मोबाईलमध्ये हे स्पॅम कॉल ऑटोमॅटीक ब्लॉक करु शकतो. यासाठी मोबाईल मध्ये Google Dialer असायला हवे. जर तुमच्या फोनमध्ये डिफॉल्ट अॅप गुगल डायलर असेल तर तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन स्पॅम कॉल्स ब्लॉक करता येतील. नसेल तर मोबाईल डायलर डाऊनलोड करुन घ्या. यानंतर सेटिंगमध्ये जाऊन तेथे टॉप राईट कॉर्नरला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. येथे क्लिक करताच तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. त्यात सेटिंग असेल त्यावर क्लिक करा. सेटिंगवर क्लिक करताच Caller ID & Spam असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करुन See Caller and Spam ID याला ऑन करा. यानंतर Filter Spam Calls ऑप्शन ऑन करा. यानंतर तुमच्या फोनवर येणारे स्पॅम कॉल्स ऑटोमॅटीक ब्लॉक होऊन जातील.

ही सेटींग केल्याने केवळ तेच कॉल ब्लॉक होतील ज्यांना लोकांनी स्पॅम मार्क केलेलं असेल.

Spam Call Blocker
Electric Bike : अवघ्या ३५ हजारांची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; ९० सेकंदात बदलली जाणार बॅटरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com