esakal | फोनमध्ये स्पेस नसल्यास गूगल ड्राइवला फोटो स्टोअर करण्याची पद्धत
sakal

बोलून बातमी शोधा

फोनमध्ये स्पेस नसल्यास गूगल ड्राइवला फोटो स्टोअर करण्याची पद्धत

फोनमध्ये स्पेस नसल्यास गूगल ड्राइवला फोटो स्टोअर करण्याची पद्धत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

साधारणत: मोबाईलमध्ये (mobile) स्पेस नाही या करणामुळे बऱ्याच वेळा आपल्याला जवळील डेटा, फोटो, व्हिडीओ क्लिअर करावे लागतात. मित्रांसोबतचे, ट्रीप किंवा पिसनिकचे फोटो, व्हिडीओ डिलीट करावे लागतात. नाईलाजाने आपल्याला अनेकवेळा असे करावे लागते. आपल्याकडे लॅपटॉप असून दरवेळी तिथे हे फोटो, व्हिडीओ कॉपी करण्यासही आपण कंटाळा करतो. परंतु हे फोटो सेव्ह करुन ठेवायचे असल्यास एक सोयीचे टुल म्हणजे गूगल ड्राइव. (google drive) तुम्हाला मोबाईलमधील फोटो कायमचे सेव्ह किंवा स्टोअर करायचे असल्यास गुगलद्वारे (google) फ्रीमध्ये वापरण्यास दिलेले हे टुल तुम्ही वापरु शकता. यामध्ये तुम्ही सोयीस्कर पद्धतीने तुमचा डेटा स्टोअर करु शकता. या गूगल ड्राइवमध्ये तुम्ही फोटो कसे स्टोअर कराल याची प्रक्रीया आम्ही आज सांगणार आहोत. (how to store photos and videos google drive process)

गूगल ड्राइवमध्ये फोटो किंवा व्हिडीओ स्टोअर करण्यासाठी सुरुवातीला हे टुल डाउनलोड करुन घ्यावे लागेल. गूगल प्ले स्टोअरवरून तुम्ही सोप्या पद्धतीने हे डाउनलोड करुन घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये एक अकाउंट ओपन करावे लागेल. यासाठी तुम्ही जी-मेलची मदत घेऊ शकता. कारण जी-मेल नसेल तर तुम्ही फोटो यामध्ये स्टोअर करु शकणार नाही.

अकाऊंट ओपन झाल्यानंतर दोन पर्याय दिसतील. जिथे तुम्ही फोल्डरला एक नाव देऊ शकता. यानंतर अॅड टू या ऑप्शनला क्लिक केल्यास तुम्ही फोन गॅलरीमध्ये (mobile gallery) एंट्री कराल. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला हवे ते फोटो तुम्ही गूगल ड्राइव्हला स्टोअर करु शकता. अशाच प्रकारे लॅपटॉपमध्येही तुम्ही फोटो स्टोअर करु शकता.

हेही वाचा: व्हॉट्सअ‍ॅपवरून फुलसाईझ फोटो, व्हिडिओ कसे पाठवायचे, जाणून घ्या सोप्या टिप्स

फोटोशिवाय तुम्ही व्हिडीओ स्टोअर करु शकता. यासाठी याचा एक फोल्डर तयार करुन फोटोप्रमाणे व्हिडीओ सिलेक्ट करुन स्टोअर करु शकता. परंतु हे व्हिडीओ स्टोअर करण्यासाठी इंटरनेटेच्या (internet) स्पीडचे प्रमाण तुलनेत अधिक असणे गरजेचे आहे. तुम्ही वेगवेगळ्या इवेंटचे फोल्डर तयार करुन फोटो आणि व्हिडीओ स्टोअर करु शकता. परंतु हेही लक्षात ठेवले पाहिजे की, या टुलमध्येही लिमीटेड स्पेस असते. ती फुल्ल झाल्यानंतर यासाठी तुम्हाला वेगळी स्पेस खरेदी करुन घ्यावी लागते.

loading image