esakal | Android वरून iPhone वर असे करा कॉन्टॅक्ट ट्रान्सफर
sakal

बोलून बातमी शोधा

Android वरून iPhone वर असे करा कॉन्टॅक्ट ट्रान्सफर

जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन आयफोनवर शिफ्ट केले आहे आणि आयफोनवर कॉन्टॅक्ट कसे ट्रान्स्फर करावे हे आपल्याला समजत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी होईल. येथे अँड्रॉइड फोनवरून आयफोनवर कॉन्टॅक्ट कसे ट्रान्स्फर करायचे ते जाणून घ्या

Android वरून iPhone वर असे करा कॉन्टॅक्ट ट्रान्सफर

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

पुणे: जर तुम्ही अँड्रॉईड फोनवरून आयफोनवर शिफ्ट केले आहे आणि आयफोनवर कॉन्टॅक्ट कसे ट्रान्स्फर करावे हे तुम्हाला समजत नसेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही येथे तुम्हाला एक खास ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या Android फोनमध्ये असलेले कॉन्टॅक्ट आयफोनवर सहजपणे ट्रान्स्फर करू शकता.

हेही वाचा: गुगलने बदलली दहा वर्षाची परंपरा; 'अँड्रॉईड क्यू'चे नाव बदलणार

असे ट्रान्स्फर करा अँड्रॉइड वरून आयफोनवर कॉन्टॅक्ट...

- Android वरून iPhone वर कॉन्टॅक्ट ट्रान्स्फर करण्यासाठी, सुरवातीला तुमच्या फोनवर Google Play Store वरून Move to iOS अॅप डाउनलोड करा.

- डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर अॅप ओपन करा

- आता तुमचा कोड शोधा स्क्रीन वर टॅप करा

- येथे तुम्हाला मूव्ह डेटा फ्रॉम एंड्राइड चा ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करा

- आता तुमच्या iPhone वर जा, सेटअप इथे पूर्ण करा

- मग मूव्ह डेटा फ्रॉम अँड्रॉइड ऑप्शनवर टॅप करा

- तुम्हाला आता 6 किंवा 10 अंकी कोड प्राप्त होईल, तो तुमच्या Android फोनवर एन्टर करा

- तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्ट च्या चिन्हावर क्लिक करा

- आता दोन्ही डिव्हाइस थोडावेळ सोडा

- एकदा लोडिंग बार पूर्ण झाल्यावर कॉन्टॅक्ट Android वरून आयफोनवर ट्रान्सफर केले जातील.

हेही वाचा: WhatsApp वापरकर्त्यांसाठी खुशखबर! आता लवकरच Android मधून iOS वर चॅट ट्रान्सफर शक्य

Google अकाउंटद्वारे Android वरून iPhoneवर कॉन्टॅक्ट ट्रान्सफर करा...

- तुम्ही Android वरून iPhoneवर कॉन्टॅक्ट ट्रान्सफर करू इच्छित असल्यास सुरवातीला तुमचे कॉन्टॅक्ट Google अकाउंटसह लिंक केलेले आहे की नाही याची खात्री करुन घ्या.

- तसेच तुमच्याकडे एक अॅक्टिव इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

- अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी, Android फोनच्या सेटिंग्जवर जा.

- खाली स्क्रोल करा, तुमच्या अकाउंटवर जा आणि Googleअकाउंटवर टॅप करा

- येथून तुम्ही तुमच्या अकाउंटसह Google अकाउंटशी लिंक करू शकता.

- जर कॉन्टॅक्ट तुमच्या Googleअकाउंटशी जोडलेले असेल तर आता आयफोनच्या सेटिंग्जवर जा

- आता मेल ऑप्शनवर क्लिक करा

- येथे Google अकाउंटमधून लॉग-इन करा आणि कॉन्टॅक्टचे टॉगल (toggle)ऑन करा

- यानंतर तुमचे सर्व कॉन्टॅक्ट आयफोनवर ट्रान्सफर केले जातील

loading image
go to top