Fastag KYC Update : दोन दिवसात अपडेट करून घ्या 'फास्टॅग', अन्यथा एक फेब्रुवारीपासून होईल ब्लॅकलिस्ट! जाणून घ्या प्रक्रिया

Fastag KYC deadline on January 31: How to do it, documents needed... फास्टॅगचे 'नो युवर कस्टमर' म्हणजेच केवायसी डीटेल्स अपडेट करण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत दिली आहे.
Fastag KYC Update
Fastag KYC UpdateeSakal

Fastag KYC Update Process : एक्स्प्रेस-वे आणि नॅशनल हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. फास्टॅगचे 'नो युवर कस्टमर' म्हणजेच केवायसी डीटेल्स अपडेट करण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत दिली आहे. केवायसी अपडेट न करणारे फास्टॅग एक फेब्रुवारीपासून ब्लॅकलिस्ट केले जातील असं एनएचएआयने स्पष्ट केलं आहे.

एक तारखेनंतर काय होणार?

लाईव्ह हिंदुस्तानने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 31 तारखेपर्यंत केवायसी अपडेट न केल्यास एक फेब्रुवारीपासून फास्टॅग ब्लॅकलिस्ट होईल. एक तारखेनंतर देखील केवायसी अपडेट करता येणार आहे. मात्र, जोपर्यंत हे अपडेट होत नाही तोपर्यंत टोल प्लाझावर फास्टॅगने पेमेंट करता येणार नाही. (Fastag KYC Update Deadline)

निर्णयामुळे लोक गोंधळात

या निर्णयामुळे कित्येक लोक गोंधळात आहेत. कित्येक प्रकरणांमध्ये गाडी एका व्यक्तीच्या नावावर आणि फास्टॅग दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे. एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीची गाडी आहे, त्याच व्यक्तीच्या नावाने फास्टॅग असणं गरजेचं आहे. अर्थात, हा नियम सध्या शिथील करण्यात आला आहे. सध्या केवळ ज्या व्यक्तीच्या नावावर फास्टॅग आहे, त्याची केवायसी झालेली असणं गरजेचं आहे. (Fastag KYC Rules)

Fastag KYC Update
Telecom Data Leak : तब्बल 7.5 कोटी भारतीयांचा डेटा लीक, टेलिकॉम मंत्रालयाचं मोबाईल कंपन्यांना सिक्युरिटी ऑडिटचं आवाहन

असं करा केवायसी अपडेट

वेबसाईट

  • आपले केवायसी अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी फास्टॅगच्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

  • यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपी याच्या मदतीने लॉगइन करा.

  • होमपेजवर 'माय प्रोफाईल' हा पर्याय निवडा, आणि त्यातील KYC पर्यायावर क्लिक करा.

  • यानंतर विचारलेली माहिती भरुन सबमिट बटणावर क्लिक करा.

  • तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

अ‍ॅप

तुम्ही ज्या कंपनीचा फास्टॅग घेतला आहे, त्याचं फास्टॅग वॉलेट अ‍ॅप घ्या. यामध्ये लॉग-इन करुन माय प्रोफाईलला जा. त्यानंतर केवायसी पर्यायावर क्लिक करुन तुम्ही तपासू शकता की तुमची केवायसी झाली आहे का. अपडेट नसल्यास तिथेच केवायसी फिल या पर्यायवर क्लिक करुन तुम्ही केवायसी अपडेट करू शकता. (How to update Fastag KYC)

Fastag KYC Update
Apple Watch Saved Life : अ‍ॅपल वॉचच्या मदतीने वाचला महिलेचा जीव; विमानाचं केलं इमर्जन्सी लँडिंग!

ऑफलाईन

तुम्ही बँक किंवा टोल प्लाझाच्या हेल्प काऊंटरवर देखील केवायसी अपडेट करू शकता. यासाठी तुमच्याकडे आधार-लिंक्ड मोबाईल नंबर, आधार, पॅन आणि गाडीची आरसी असणं गरजेचं आहे. ही प्रक्रियाही ऑनलाईनच होईल, मात्र हेल्प सेंटरवरचे कर्मचारी त्यासाठी तुम्हाला मदत करतील. (Fastag KYC Update offline)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com