आधार कार्डमध्ये जन्मतारीख चूकलीय? घरबसल्या करा दुरुस्त, पाहा प्रोसेस

how to update date of birth in Aadhaar card
how to update date of birth in Aadhaar card Sakal

how to update date of birth in Aadhaar card : आधार कार्ड हे भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. सरकारी काम असो की खाजगी, आधारकार्ड सर्वत्र उपयोगी पडत असल्याने त्यातील प्रत्येक माहिती अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही आधार कार्डमध्ये तुमचा फोटो घरबसल्या बदलू शकता, इतकेच नाही तर PVC आधार कार्ड मागवणे, तुमचा मतदार आयडी आधारशी कसा लिंक करणे आणि तुमचा फोन नंबर घरबसल्या आधारमध्ये अपडेट करणे इत्यादी कामे घरबसल्या करता येतात.

आपल्या सर्वांना माहिती आहे की, आधार कार्डमध्ये नाव, वडिलांचे नाव, लिंग, जन्म वर्ष किंवा जन्मतारीख यासारखी माहिती असते. कोणत्याही कारणास्तव, आधार कार्डमध्ये तुमची जन्मतारीख (DOB) चुकीची असल्यास आणि तुम्ही आधार केंद्रात न जाता देखील घरी बसून तुमच्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोनवरून ती अपडेट करू इच्छित असाल, तर आम्ही त्यासाठी खाली सोप्या स्टेप्स सांगणार आहोत.

how to update date of birth in Aadhaar card
जग्वार, लँड रोव्हर नाही, तर रतन टाटांना मिळाली खास इलेक्ट्रिक नॅनो

घरी बसून आधार कार्डवरील जन्मतारीख (DOB) कशी बदलावी:

  • यासाठी, तुम्हाला UIDAI वेबसाइटला भेट द्यावी लागेल किंवा फक्त ssup.uidai.gov.in वर क्लिक करावे लागेल.

  • खाली स्क्रोल करा, येथे अपडेट आधार सेक्शनमध्ये अपडेट डेमोग्राफिक्स डेटा आणि चेक स्टेटस पर्यायावर क्लिक करा.

  • येथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक एंटर करा, कॅप्चा व्हेरिफिकेशन पूर्ण करा आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर वर मिळालेला OTP एंटर करा.

  • पुढे, तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख अपडेट करण्यासाठी ' अपडेट आधार ' पर्यायावर क्लिक करा.

  • आता Proceed to Update Aadhaar वर क्लिक करा.

  • येथे तुम्हाला अपडेट डेट ऑफ बर्थ (DOB) चा पर्याय दिसेल. यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे देखील सादर करावी लागतील.

  • (टीप- जन्मतारीख बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा लागतो.)

how to update date of birth in Aadhaar card
उभ्या गाड्यांनाही आगीचा धोका! Hyundai, Kia ने लाखो कार मागवल्या परत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com