
Google’s Nano Banana AI feature on WhatsApp is revolutionizing social media with instant creative image generation
esakal
गुगलचा नॅनो बनाना फीचर व्हॉट्सअॅपवर सहज वापरासाठी उपलब्ध आहे.
यामुळे वापरकर्ते जलद आणि क्रिएटिव्ह फोटो तयार करू शकतात.
सोशल मीडियावर या फीचरमुळे नवा फोटो शेअरिंग ट्रेंड तयार झाला आहे.
सोशल मीडियावर सध्या एक नवा ट्रेंड जोर धरतो आहे – गुगलचे नॅनो बनाना फीचर. या फीचरच्या मदतीने लोक स्वतःचे साडीतील फोटो, सेलिब्रिटींसोबतचे सेल्फी, तसेच वयस्कर दिसणारे फोटो तयार करत आहेत. काही सेकंदांत तयार होणाऱ्या या इमेजेसमुळे हा ट्रेंड व्हायरल झाला असून इंस्टाग्राम, फेसबुक, एक्ससह व्हॉट्सअॅप स्टेटसवरही हे फोटो धुमाकूळ घालत आहेत.