
facebook meet cute match
esakal
मेटाने आपल्या फेसबुक डेटिंग सेवेत नाविन्यपूर्ण बदल केले असून, ‘मीट क्यूट’ नावाचे नवे फीचर सादर केले आहे. 2019 मध्ये सुरू झालेली ही डेटिंग सेवा आता विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे. मेटाच्या या नव्या अपडेट्समुळे वापरकर्त्यांना त्यांच्या आवडी-निवडींनुसार योग्य जोडीदार शोधणे अधिक सोपे होणार आहे. यामध्ये डेटिंग असिस्टंट आणि ‘मीट क्यूट’ फीचरचा समावेश आहे जे वापरकर्त्यांना पर्सनल अनुभव देण्यासाठी डिझाइन केले आहे.