

NPCI launches UPI Mapper
esakal
भारतातील डिजिटल पेमेंट्सच्या दुनियेत खळबळ उडाली आहे.. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI सिस्टममध्ये क्रांतिकारी बदल केला आहे. नवीन UPI मॅपर फीचरमुळे आता वापरकर्ते कोणत्याही एका अॅपमध्ये अडकून राहणार नाहीत. फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम सारख्या मोठ्या अॅप्सचा एकाधिकार संपला आहे. NPCI ने सर्व UPI अॅप्सना आदेश दिला की वापरकर्त्यांना त्यांच्या पसंतीचे अॅप निवडण्याची मोकळीक द्या. यामुळे स्पर्धा वाढेल आणि नवीन अॅप्सना संधी मिळेल