Internet : इंटरनेट डेटा मिळणार आता उधार; 'या' कंपनीचं कार्ड तुमच्याकडे आहे का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Internet mobile data

कोणत्या कंपनीने ही सुविधा सुरू केली आहे, वाचा सविस्तर बातमीमध्ये..

Internet : इंटरनेट डेटा मिळणार आता उधार; 'या' कंपनीचं कार्ड तुमच्याकडे आहे का?

ऑनलाईन काहितरी महत्त्वाचे काम करताना किंवा एखादा आवडता चित्रपट बघताना अचानक इंटरनेट डेटा संपतो. त्यावेळी रात्रीचे बारा कधी वाजतात आणि इंटरनेट कधी सुरू होतं याची आपल्याला वाट बघावी लागते. पण, आता आपल्याला कंपनीकडून इंटरनेट उधार घेता येणार आहे. कोणत्या कंपनीने ही सुविधा सुरू केली आहे. त्या कंपनीचे कार्ड तूमच्याकडे आहे का? चला जाणून घेऊयात... (Internet mobile data)

हेही वाचा: 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील रीचार्ज; जाणून घ्या इतरही बेनेफिट्स

तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही ज्या प्रकारे उधार किंवा कर्ज घेता त्याचप्रमाणे तुम्ही डेटासुद्धा घेऊ शकणार आहात. एअरटेलने ही सुविधा सुरू केली आहे. यामुळे तूम्ही फोन त्वरित रिचार्ज करू शकता. अनेकदा आपला डेटा संपतो अशा परिस्थितीत आपल्याला डेटाची गरज भागवण्यासाठी त्वरित रिचार्ज करावं लागतो किंवा इतरांच्या हॉटस्पॉटवरून काम चालवावं लागतं.

कसा मिळेल उधार डेटा

  • तुम्हाला तुमच्या फोनवर *141*567# कोड डायल करावा लागेल. कोड डायल केल्यावर तुम्हाला 2G, 3G आणि 4G नेटवर्क निवडावे लागेल.

  • तुम्ही 52141 हा क्रमांक डायल करूनही इंटरनेट डेटा उधार घेऊ शकता. हा नंबर डायल करताच काही सूचना फॉलो करून तुम्हाला डेटा उधार मिळेल

  • Airtel Thanks मोबाईल अ‍ॅपवरून देखील इंटरनेट डेटा घेऊ शकता.

  • एअरटेल युजर्सना हे कर्ज मोफत मिळणार नाही. म्हणजेच या सेवेसाठी पैसे द्यावे लागतील. ग्राहकांसाठी घेतलेले उधार ठराविक दिवसांनंतर परत करावे लागेल.

हेही वाचा: ‘कू’वर बहुभाषिक वाचनानंद

Web Title: How Use Internet Data Loan In Airtel Thanks App

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..