HP ने भारतीय विद्यार्थ्यांसाठी लॉन्च केला क्रोमबुक लॅपटॉप, जाणून घ्या किंमत

टीम ईसकाळ
Thursday, 8 April 2021

कोरोना महामारीची सुरुवात झाल्यापासून मुलांचे शिक्षण हे फोन, टॅब आणि लॅपटॉपवर मर्यादित झाली आहे. स्मार्टफोनला बऱ्याच मर्यादा आहेत आणि किमती जास्त असल्यामुळे लॅपटॉप हे अनेकांच्या आवाक्याबाहेर आहेत.

HP ने भारतीय विद्यार्थ्यांसाठी लॉन्च केला क्रोमबुक लॅपटॉप 

कोरोना महामारीची सुरुवात झाल्यापासून मुलांचे शिक्षण हे फोन, टॅब आणि लॅपटॉपवर मर्यादित झाली आहे. स्मार्टफोनला बऱ्याच मर्यादा आहेत आणि किमती जास्त असल्यामुळे लॅपटॉप हे अनेकांच्या आवाक्याबाहेर आहेत. दरम्यान एचपी कंपनीने HP Chromebook 11a नावाचा एक नवीन परवडणारा लॅपटॉप बाजारात आणला असून त्याची सुरुवातीची किंमत 21,999 रुपये आहे. हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यानंतर 16 तासांचा बॅकअप देतो. आज आपण या लॅपटॉपबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. 

एचजी क्रोमबुक 11 ए या लॅपटॉपमध्ये अनेक दर्जेदार फीचर्स  देण्यात आलेले आहेत. हा लॅपटॉप खासकरुन विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आला आहे, जेणेकरून ते सहजपणे Google डॉक्यूमेंट्स आणि ऑनलाइन क्लास अगदी सहज हताळू शकतील. हा लॅपटॉप क्रोम ओएसवर चालतो आणि त्याचे वजन 1 किलो आहे तसेच हा मीडियाटेक एमटी 8183 ऑक्टाकोर प्रोसेसरसह सुसज्ज आहे. 

HP Chromebook 11a डिस्प्ले

एचपी क्रोमबुक 11 ए लॅपटॉप क्रोम ओएस देण्यात आलेले आहे, ज्याच्या मदतीने गूगल प्ले स्टोअर वापरता येते. लॅपटॉपमध्ये 11.6 इंचाचा एचडी आयपीएस टच डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 1,366 x 768 पिक्सेल आहे. यामध्ये  220 निट्स ब्राइटनेस आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशो  73..8 आहे. 

HP Chromebook 11a चे पोर्ट्स 

एचपी क्रोमबुक ११ ए मध्ये यूएसबी ए, यूएसबी सी पोर्ट देण्यात आले आहेत आणि यात मायक्रोएसडी कार्ड रीडर देखील आहे. या लॅपटॉपची बॅटरी एकाच चार्जवर 16 तासांची बॅटरी बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. 

HP Chromebook 11a चा कॅमेरा 

या लॅपटॉपमध्ये एचडी कॅमेरा देण्यात  आला आहे, जो ऑनलाइन क्लास आणि ऑनलाइन मिटींग या दोन्हीत उपयुक्त ठरतो. तसेच, यात पूर्ण आकाराचा कीबोर्ड आहे. कंपनीने 64 जीबी अंतर्गत स्टोरेज दिले असून ते 100 जीबी क्लाऊड स्टोरेजसह देण्यात येते. लॅपटॉपच्या रॅमची माहिती दिली गेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hp chromebook 11a affordable laptop launched In India know price specifications Marathi Article