Twitter, Meta नंतर HP Inc चा मोठा निर्णय; कंपनी 4,000 ते 6,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HP Inc

ट्विटरनंतर आता दिग्गज कंपनी HP Inc नं देखील मोठा निर्णय घेतलाय.

Twitter, Meta नंतर HP Inc चा मोठा निर्णय; कंपनी 4,000 ते 6,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार!

Layoffs : ट्विटरमधील टाळेबंदीमुळं गेले बरेच दिवस ट्विटर चर्चेत आहे. ट्विटरनंतर आता दिग्गज कंपनी HP Inc नं देखील मोठा निर्णय घेतलाय. देशात आणि जगातील अनेक कंपन्यांमधून नवीन नोकरभरतीच्या बातम्या समोर येत आहेत. तर, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं जात आहे.

आता यात आणखी एका कंपनीची भर पडलीय. संगणक आणि प्रिंटर निर्माता HP Inc नं मंगळवारी सांगितलं की, कंपनी येत्या 3 वर्षात 4000 ते 6000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. ऑक्टोबर 2021 पर्यंत HP मध्ये सुमारे 51,000 कर्मचारी होते. 2019 मध्ये HP नं घोषणा केली की ते 7,000 ते 9,000 कर्मचारी काढून टाकतील. त्यानंतर आता हा निर्णय घेतला गेला आहे. तंत्रज्ञान कंपनीनं टाळेबंदीबाबत हा महत्वाचा निर्णय घेतल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. HP Inc मधील ही कपात त्यांच्या सध्याच्या कर्मचार्‍यांच्या सुमारे 10 टक्के असल्याचं म्हटलं जात आहे. हा कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या योजनांचा एक भाग आहे. एचपीची सतत कमी होत चाललेली विक्री आणि अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळं कंपनींना हा निर्णय घेतलाय. कंपनीनं सांगितलं की, चौथ्या तिमाहीतील महसुलात 11.2 टक्क्यांनी घट झालीय, जी एका वर्षापूर्वी याच तिमाहीत $14.8 अब्ज नोंदवली गेली होती.

हेही वाचा: Government Jobs : मोदी सरकार दर महिन्याला 16 लाख रोजगार निर्माण करतं; रेल्वेमंत्र्यांचा मोठा दावा

एचपी विक्रीत घट

कंपनीनं डेस्कटॉप विक्री देखील टाळण्याच्या निर्णयामागील एक कारण नमूद केलंय. यामुळं पर्सनल कॉम्प्युटर कंपन्यांना अलीकडच्या काही महिन्यांत मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. कंपनीनं सांगितलं की, चौथ्या तिमाहीत त्यांच्या संगणक विभागाच्या विक्रीत 13 टक्के घट झाली असून ती 10.3 अब्ज डॉलरवर आली आहे. यामुळं कंपनीच्या एकूण ग्राहक महसुलात वर्षभरात 25 टक्क्यांची घट झाली आहे.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

कंपनीच्या सीईओंचं विधान

एचपी इंक.चे सीईओ एनरिक लोरेस यांनी एका निवेदनात म्हटलंय की, अस्थिर मॅक्रो वातावरण आणि मागणी कमी झाल्यामुळं गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या उत्पादनांची विक्री कमी झाली आहे. HP Inc ची टाळेबंदी हे सूचित करते की जगातील अनेक देशांमध्ये मंदीची भीती अधिक गडद होत आहे. चढे व्याजदर आणि वाढत्या महागाईच्या जमान्यात Amazon, Meta, Twitter सारख्या अनेक बड्या कंपन्यांनी टाळेबंदीचे संकेत दिले आहेत.