
एचटीसीने स्मार्ट चष्म्यांच्या क्षेत्रात प्रवेश करताना आपला पहिला एआय स्मार्ट चष्मा 'एचटीसी व्हिव्ह ईगल' लाँच केला आहे.
मेटा आणि शाओमीनंतर एचटीसीने या नव्या तंत्रज्ञानाच्या शर्यतीत उडी घेतली आहे.
ज्यामुळे स्मार्टफोनच्या बाजारात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
टेक्नॉलॉजीच्या जगात एक नवीन क्रांती घडत आहे. एकेकाळी स्मार्टफोनच्या बाजारात आपली छाप पाडणारी एचटीसी कंपनी आता स्मार्ट चष्म्यांच्या क्षेत्रात उतरली आहे. कंपनीने आपला पहिला एआय स्मार्ट चष्मा एचटीसी व्हिव्ह ईगल लाँच केला आहे. हा चष्मा स्मार्टफोनच्या भविष्याला आव्हान देण्याची क्षमता ठेवतो. मेटा आणि शाओमीनंतर आता एचटीसीने या नव्या तंत्रज्ञानाच्या शर्यतीत उडी घेतली आहे. सध्या हा चष्मा तैवानमध्ये १५,६०० नवीन तैवान डॉलर्स (सुमारे ४५,५०० रुपये) किंमतीत उपलब्ध आहे. लवकरच तो जागतिक बाजारात येण्याची शक्यता आहे.