

Huawei Mate 70 Air price features competition to Apple iPhone Air
esakal
Huawei Mate 70 Air price : हुवावेने (Huawei) आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन मेट 70 एअर लाँच केला आहे. हा फोन अॅपलच्या आयफोन एअरला थेट आव्हान देत आहे. फक्त 6.6 मिमी जाडी आणि 206 ग्रॅम वजन असलेला हा अल्ट्रास्लिम डिव्हाइस सेलेस्टियल इन्स्पायर्ड डिझाइनने सजलेला आहे. सोन्याच्या धाग्यांनी विणलेले ब्रोकेड सिल्क अॅक्सेंट्स आणि चमकदार स्टार रिंग इफेक्ट यामुळे तो आकाशातल्या सौंदर्याच प्रतिबिंब वाटत. गोलाकार कॅमेरा मॉड्यूलमध्ये सोन्याचे अॅक्सेंट्स आहेत, जे फोनला प्रीमियम लुक देतात..चीनमध्ये हा मोबाईल नुकताच लॉंच झालाय