जबरदस्त डिस्काउंट! ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त १३ हजारात, ऑफर घ्या जाणून | Smart TV Offer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

infinix smart tv

Smart TV Offer: जबरदस्त डिस्काउंट! ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त १३ हजारात, ऑफर घ्या जाणून

Discount on Infinix 43 inch Smart TV: घरातील टीव्ही जुना झाला असेल व जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. नवीन स्मार्ट टीव्हीसाठी अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. ई-कॉमर्स साइट Flipkart वर Black Friday Sale मध्ये तुम्ही टीव्हीला स्वस्तात खरेदी करू शकतात. फ्लिपकार्टवर ४३ इंच स्क्रीनसह येणारा स्मार्ट टीव्ही आकर्षक ऑफरसह उपलब्ध आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Infinix Y1 43 inch Full HD LED Smart TV (43Y1) या टीव्हीवर तुम्हाला ऑफरचा फायदा मिळेल. या टीव्हीची विक्री आजपासून सुरू होईल. टीव्हीची मूळ किंमत जवळपास २५ हजार रुपये आहे. परंतु, तुम्ही खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता.

इनफिनिक्सच्या टीव्हीवर मिळेल बंपर ऑफर

Infinix 43 inch Smart TV ची मूळ किंमत २४,९९९ रुपये आहे. परंतु, ४४ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १३,९९९ रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावर बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहे. टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल.

Citi बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स, ICICI बँक क्रेडिट कार्ड, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्ड आणि Kotak बँक डेबिट अथवा क्रेडिट कार्ड्सचा वापर केल्यास २ हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. तसेच, जुना टीव्ही देऊन १२,५९९ रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा घेऊ शकता.

हेही वाचा: Lava Smartphone: १० हजारांच्या बजेटमध्ये आला शानदार स्मार्टफोन, ७ जीबी रॅमसह मिळतील जबरदस्त फीचर्स

दमदार फीचर्ससह येतो Infinix 43 inch Smart TV

इनफिनिक्सचा हा टीव्ही ४३ इंच डिस्प्लेसह येतो. याचे रिझॉल्यूशन १९२०x१०८० पिक्सल आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. हा टीव्ही Linux आधारित सॉफ्टवेअरवर काम करतो. यात युट्यूब, प्राइम व्हीडिओ सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट दिला आहे. शानदार ऑडिओ परफॉर्म्ससाठी यात २० वॉट आउटपूटसह डॉल्बी ऑडिओचा सपोर्ट मिळतो.

कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ सपोर्टसह दोन एचडीएमआय पोर्ट्स आणि दोन यूएसबी पोर्ट्स दिले आहेत. या टीव्हीसह वॉलमाउंट आणि बेस स्टँडस दिले जात आहे. सोबतच, स्मार्ट रिमोट देखील मिळेल.

टॅग्स :TechnologytvLED TV