iPhone Offer: आयफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, ३० हजार रुपये स्वस्तात करा खरेदी; पाहा ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iPhone 14

iPhone Offer: आयफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, ३० हजार रुपये स्वस्तात करा खरेदी; पाहा ऑफर

Offer On iPhone 14: ई-कॉमर्स प्लेटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सेलची घोषणा केली आहे. तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. सेलमध्ये iPhone 14 ला बंपर डिस्काउंटसह खरेदी करता येईल.

आयफोन १४ च्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७९,९०० रुपये आहे. मात्र, सेलमध्ये सर्व ऑफर्सचा फायदा मिळाल्यास फोनला फक्त ४७,९९० रुपयात खरेदी करता येईल. आयफोनवर मिळणाऱ्या या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Amazon Sale: सुरू होतोय वर्षातील पहिला बंपर सेल, फोन-टीव्ही निम्म्या किंमतीत खरेदीची संधी

iPhone 14 वर मिळेल बंपर ऑफरचा फायदा

iPhone 14 स्मार्टफोन १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेजसह येतो. फ्लिपकार्टवर हे सर्व मॉडेल स्वस्तात उपलब्ध आहेत. फोनचे १२८ जीबी व्हेरिएंट ६ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर ७३,९९० रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे.

फोन खरेदी करताना एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर केल्यास ४ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डवर ५ टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच, फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता.

या फोनवर २३ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास आयफोन १४ ला फक्त ४७,९९० रुपयात खरेदी करता येईल.

हेही वाचा: Kia Carens: किआचा जलवा! 'ही' ठरली वर्षातील सर्वोत्तम कार, फीचर्स खूपच अफलातून

iPhone 14 चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

iPhone 14 मध्ये ६.१ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन ११७०x२५३२ पिक्सल, पीक ब्राइटनेस १२० निट्स आहे. फोन ऑलवेज ऑन डिस्प्ले सपोर्टसह येतो.

फोनमध्ये ए१५ बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, फोटोग्राफीसाठी रियरला १२ मेगापिक्सल आणि फ्रंटला १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फोन ई-सिम आणि सेटेलाइट कनेक्टिव्हिटीसह येतो.

हेही वाचा: पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग