Kawasaki Bikes
Kawasaki BikesSakal

Kawasaki Bikes: तब्बल १.२५ लाख रुपये स्वस्तात मिळतेय Kawasaki ची लोकप्रिय बाईक, नववर्षात खरेदीची सुवर्णसंधी

Kawasaki ने ग्राहकांसाठी खास ऑफरची घोषणा केली आहे. डिसेंबर महिन्यात कंपनीच्या बाईक्सला तब्बल सव्वा लाख रुपये स्वस्तात खरेदीची संधी आहे.

Offer On Kawasaki Bike: गेल्याकाही वर्षात भारतात बाईक वापरणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. तुम्ही देखील नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Kawasaki च्या बाईक्सला खूपच स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. Kawasaki India आपल्या दोन बाईक्सवर बंपर डिस्काउंट देत आहे. कंपनीने 'गुड टाइम्स वाउचर' नावाने या ऑफरची घोषणा केली आहे.

कंपनी Kawasaki Z650 आणि Kawasaki W800 या बाईक्सवर बंपर डिस्काउंट देत आहे. या बाईकला डिसेंबर महिन्यात स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. Kawasaki च्या दोन्ही बाईक्सवर मिळणाऱ्या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

Kawasaki Z650 वर बंपर डिस्काउंट

Kawasaki Z650 बाईकला तुम्ही डिसेंबर महिन्यात बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. बाईकवर ३५ हजार रुपये डिस्काउंट मिळेल. याची एक्स-शोरुम किंमत ६.४३ लाख रुपये आहे मात्र, डिस्काउंटनंतर फक्त ६.०८ लाख रुपयात खरेदी करू शकता. Z650 मध्ये ६४९सीसी, पॅरेलल-ट्विन इंजिन दिले असून, जे ८००० आरपीएमवर ६६एचपीची मॅक्सिमम पॉवर आणि ६७०० आरपीएमवर ६४एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते.

Kawasaki Bikes
Upcoming Smartphones: नवीन स्मार्टफोन खरेदी करायचाय? डिसेंबरमध्ये लाँच होणाऱ्या फोन्सची लिस्ट एकदा पाहाच

Kawasaki W800 वर देखील मिळेल बंपर डिस्काउंट

Kawasaki W800 बाईकला तुम्ही १.२५ लाख रुपयांच्या धमाकेदार डिस्काउंटसह खरेदी करू शकता. बाईकची एक्स-शोरुम किंमत ७.३३ लाख रुपये आहे. मात्र, डिस्काउंटनंतर फक्त ६.०८ लाख रुपयात खरेदी करू शकता. W800 हे रेट्रो मॉडेल आहे. यामध्ये ७७३सीसी, एअर-कूल्ड, ट्विट सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे ४६hp पॉवर आणि ६३Nm पीक टॉर्क जनरेट करते.

Kawasaki ची ही बाईक Triumph Speed Twin 900 (८.७९ लाख रुपये एक्स-शोरूम) आणि Bonneville T100 (१०.०६ लाख रुपये एक्स-शोरूम) ला जोरदार टक्कर देते. दरम्यान, Kawasaki च्या दोन्ही बाईक्सला तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंतच स्वस्तात खरेदी करू शकता. ही लिमिटेड पीरियड ऑफर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com