१५ मिनिटात फुल चार्ज होणाऱ्या ५जी फोनवर हजारो रुपयांची सूट, मिळतो १०८MP चा दमदार कॅमेरा |Smartphone Offer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

xiaomi smartphone

Smartphone Offer: १५ मिनिटात फुल चार्ज होणाऱ्या ५जी फोनवर हजारो रुपयांची सूट, मिळतो १०८MP चा दमदार कॅमेरा

Xiaomi 11i Hypercharge Offer: शाओमीने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर धमाकेदार ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत Xiaomi 11i Hypercharge स्मार्टफोनच्या ६ जीबी आणि १२८ जीबी स्मार्टफोनला ३१,९९९ रुपयांऐवजी फक्त २४,९९९ रुपयात खरेदी करू शकता. हा फोन अवघ्या १५ मिनिटात फुल चार्ज होतो.

तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचे कार्ड असल्यास फोन खरेदीवर ४५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल. याशिवाय, इतर बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरल्यास ३ हजार रुपये फ्लॅट डिस्काउंट दिले जात आहे. शाओमीचा हा फोन दमदार फीचर्ससह येतो.

हेही वाचाः काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

Xiaomi 11i Hypercharge मध्ये मिळतील दमदार फीचर्स

Xiaomi 11i Hypercharge मध्ये ६.६७ इंच फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४००x१०८० पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि टच सँपलिंग रेट ३६० हर्ट्ज आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेव्हल १२०० निट्स आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ देण्यात आला आहे.

फोनमध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज देखील मिळेल. यात मीडियाटेक डायमेंसिटी ९२० ५जी चिपसेटचा सपोर्ट मिळतो. तर फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १०८ मेगापिक्सल मुख्य कॅमेऱ्यासह ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस दिली आहे.

हेही वाचा: Mercedes-benz: आता वाऱ्याशी करा स्पर्धा! मर्सिडीजचा हटके प्लॅन, सबस्क्रिप्शन घेऊन वाढवा गाडीचा स्पीड

सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. तर पॉवर बॅकअपसाठी १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, फोन अवघ्या १५ मिनिटात ० ते १०० टक्के चार्ज होतो. फोन MIUI १२.५ वर काम करतो.

टॅग्स :mobile5G Smart Phone