Hybrid Vs Diesel Car : कोणती कार आहे सर्वात स्वस्त?

Hybrid Vs Diesel Car : हायब्रीड कारचे मायलेज पाहता ही कार चालवायला स्वस्त असेल असे वाटते
Hybrid Vs Diesel Car
Hybrid Vs Diesel Caresakal

Hybrid VS Diesel Car : इलेक्ट्रिक बाइक नंतर आता इलेक्ट्रिक कारने सुद्धा ऑटोमोबाइल क्षेत्रात उडी मारली आहे, पर्यावरण प्रेमी लोकांसाठी ही खूप उत्तम संधी आहे. खरंतर हा निर्णय पुढच्या पिढीच्या दृष्टीने खूप गरजेचा होता.

मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटा हायराईडर भारतात लाँच झाल्यानंतर हायब्रीड एसयूव्हीसाठीही दरवाजे खुले झाले आहेत. आता ग्राहकांना संपूर्ण इलेक्ट्रिक कारसह डिझेल आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञानासह हायब्रीड कारचा पर्याय उपलब्ध आहे.

हायब्रीड कार पेट्रोल-डिझेल कारपेक्षा खूप महाग आहेत. हायब्रीड कारचे मायलेज पाहता ही कार चालवायला स्वस्त असेल असे वाटते. जर आपण आपल्या बजेट नुसार किंमत कम्पेर केल्यास, हायब्रीड कार डिझेल कारपेक्षा खरोखर स्वस्त आहे का? चला बघूयात...

Hybrid Vs Diesel Car
Car Insurance : गाडीचा Insurance काढताय? या 3 गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर होईल नुकसान

मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटा हायराइडर या देशातील एकमेव हायब्रीड कार आहेत ज्या 27.97 kmpl च्या मायलेजचा दावा करतात. त्याच वेळी, Kia Seltos चे डिझेल ऑटोमॅटिक वेरिएंट देखील बाजारात आहे.

Honda City देखील हायब्रिड आणि डिझेल प्रकारात येते. आज आपण या सर्व कारची एकमेकांशी तुलना करु आणि हायब्रिड आणि डिझेलमध्ये कोणते मॉडेल सर्वात स्वस्त असेल ते पाहूया.

Hybrid Vs Diesel Car
Upcoming Cars : एप्रिल मध्ये लॉन्च होणार या पाच जबरदस्त कार्स

Vitara-Hyrider चे मायलेज

मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटा हायराइडर समान वैशिष्ट्यांसह येतात. म्हणून, त्यांचे मायलेज देखील समान मानले जाऊ शकते, कारण मारुती आणि टोयोटा दोन्ही कंपन्या त्यांच्या संबंधित मॉडेलचे मायलेज 27.97 kmpl देतात.

ऑटोकार इंडियाच्या ऑटो वेबसाइटनुसार, ग्रँड विटारा शहरात 23.77 kmpl आणि महामार्गावर 20.39 kmpl आहे. दोन्हीचे एकत्रित सरासरी मायलेज 22.08 kmpl आहे. म्हणूनच आम्ही टोयोटा हायराईडरच्या समान मायलेजचा विचार करतो.

Hybrid Vs Diesel Car
Tesla Car : टेस्लामधील त्रुटींमुळे कार हॅक होण्याची शक्यता

सेल्टोस-होंडा सिटीचे मायलेज

Kia Seltos चे मायलेज शहरात 12.90 kmpl होते, तर हायवेवर मायलेज 17.80 kmpl होते. सेल्टोसचे सरासरी मायलेज 15.35 kmpl इतके मोजले गेले. त्याच वेळी, होंडा सिटी हायब्रीडचे मायलेज शहरात 19.8 kmpl होते, तर हायवेवर 22.5 kmpl मायलेज आले आहे.

एकूण, त्याचे सरासरी मायलेज 21.15 kmpl होते. Honda City डिझेल प्रकाराचे सरासरी मायलेज (16.2 kmpl शहर आणि 19.2 kmpl महामार्ग) 17.7 kmpl आहे.

Hybrid Vs Diesel Car
Car Colors : लाल कि पांढरा, या रंगाच्या गाडीचे होतात जास्त अपघात, तूमची गाडी कोणत्या रंगाची?

हायब्रिड किंवा डिझेल - नक्की काय स्वस्त आहे?

आज 03 एप्रिलला महाराष्ट्रात डिझेलची किंमत 92.72 प्रति लीटर आहे. त्यानुसार, Hyrider ची प्रति किलोमीटर किंमत 3.31 रुपये आणि Seltos ची किंमत 7.18 रुपये आहे. त्यामुळे, सेल्टोसच्या तुलनेत Hyrider 3.87 रुपये प्रति किमीने चालवणे स्वस्त आहे.

जर तुम्ही कारच्या किमतींवर नजर टाकली तर Hyrider च्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत रु. 18.99 लाख आहे, तर Seltos च्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत रु. 18.35 लाख आहे. Hyrider ची किंमत Seltos पेक्षा 64,000 रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com