esakal | 5 ते 10 लाख रुपयांमध्ये पेट्रोल कार शोधताय? हे आहेत टॉप ऑप्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Hyundai Grand i10 Nios

5 ते 10 लाख रुपयांमध्ये पेट्रोल कार शोधताय? हे आहेत टॉप ऑप्शन

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

जर तुम्ही पेट्रोल कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाल पेट्रोल कार सेगमेंटमध्ये बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बरेच चांगले पर्याय उपलब्ध असल्यामुळे बऱ्याचदा ग्राहकांना कधीकधी योग्य ऑप्शन निवडणे कठीण होते. त्यामुळे आज आपण आज अशा काही टॉप कार मॉडल्स बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची किंमत 5 ते 10 लाख रुपयांदरम्यान आहे.

1. होंडा अमेझ

होंडा अमेझ एक लोकप्रिय 5-सीटर फॅमिली सेडान कार आहे. होंडा कंपनीचे हे भारतातील सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. या कॉम्पॅक्ट सेडान कार मघ्ये क्लास-लीडिंग केबिन स्पेससह कंफर्ट आणि बेस्ट ड्रायव्हिंग एक्सपिरीयंस मिळेल. तसेच या कारमध्ये रिडिझाइन फ्रंट फेस, एलईडी हेडलाइट्स, एलईडी फॉग लाईट आणि 15-इंच ड्युअल टोन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. यात इन्फोटेनमेंट सिस्टम अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो आणि कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स सपोर्ट करते. होंडा अमेझ 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह येते. यात मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. या कारची किंमत 6,32,000 ते 9,05,000 पर्यंत आहे.

2. मारुती सुझुकी बलेनो

मारुती सुझुकी बलेनो सध्या भारतातील प्रीमियम हॅचबॅक सेगमेंट मधील सर्वात लोकप्रिय कार आहे. कार लाँच झाल्यापासून टॉप 10 बेस्ट सेलिंग लिस्ट मध्ये या कारचा समावेश होते. कारच्या हायर व्हेरियंटमध्ये स्मार्टप्ले सिस्टम देण्यात आली आहे ज्यामध्ये आपल्याला टेक्स्ट, कॉल, नेव्हिगेट आणि म्युसीक हे फीचर्स मिळतात. बलेनो 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.2 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. कारची किंमत 5,99,000 ते 9,45,000 रुपयांपर्यंत आहे.

हेही वाचा: 15 हजार रुपयांत खरेदी करु शकता 'हे' बेस्ट स्मार्टफोन, पाहा यादी

3. Hyundai Aura

Hyundai Aura एक 5-सीटर सेडान कार आहे जी कॅस्केडिंग ग्रिल आणि बूमरॅंग-आकाराच्या ट्विन LED DRL सह येते. यामध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि क्लॅमशेल बोनट देण्यात आले आहेत, या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो, Apple कार प्ले, व्हॉईस रिकग्निशन आणि ब्लूटूथ कनेक्शनसह 8-इंच टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे. यात वायरलेस चार्जिंग देखील उपलब्ध आहे. ऑरा पेट्रोल 1.2 लिटर इंजिनसह येते. तसेच या कारची किंमत 5.99 लाख रुपयांपासून 8.72 लाख रुपयांपर्यंत आहे.

4. Hyundai Grand i10 Nios

ह्युंदाई ग्रँड i10 Nios एक स्टाईलिश प्रीमियम हॅचबॅक कार आहे. यात बूमरॅंगच्या आकाराचे डीआरएल असलेले मोठे सिग्नेचर ग्रिल देण्यात आळे असून एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि प्रोजेक्टर फॉग लाईट देखील मिळतात. या व्यतिरिक्त, ग्रँड i10 निओसमध्ये 15-इंच अलॉय व्हील आणि रूफ रेल देखील आहेत. इंटीरियरमध्ये Apple कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्टसह 8-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळते. यात वायरलेस चार्जर, यूएसबी पोर्ट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, रियर पार्किंग सेन्सर, एक कॅमेरा आणि इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण सारखी फीचर्स देखील मिळतात. या कारमध्ये 1.2 लीटर कप्पा व्हीटीव्हीटी पेट्रोल इंजिन दिले असून या कारची किंमत 5.28 लाख ते 7.92 लाख रुपये आहे.

हेही वाचा: स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये चालेल 120 km

5. निसान मॅग्नाइट

निसान मॅग्नाईट एक लोकप्रिय सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. मॅग्नाइट दोन इंजिन ऑप्शनसह येते. त्याचे 1.0 लिटर पेट्रोल इंजिन 72 PS ची मॅक्झिमम पॉवर आणि 96 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. दुसरे इंजिन टर्बोचार्ज्ड आहे जे 100 पीएस पॉवर आणि 160 एनएम टॉर्क (सीव्हीटीसह 152 एनएम) जनरेट करते. दोन्ही इंजिनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे, पण टर्बो पेट्रोल इंजिन ऑप्शनल सीव्हीटी ऑटोमॅटीक ट्रांसमिशन सोबत देखील उपलब्ध आहे. या कारमध्ये वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, हाय-एंड जेबीएल स्पीकर, एलईडी स्कफ प्लेट्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि पुडल लॅम्प सारखी फीचर्स देखील मिळतात. या कारची किंमत 5.59 लाख ते 9.74 लाख रुपय आहे.

loading image
go to top