TaTa Punch ला टक्कर देणारी Hyundai Casper लवकरच होणार लाँच; बघा फिचर्स

काही दिवसांपुर्वी ह्युंदाईने कॉम्पॅक्ट एसयुव्ही वेन्यू फेसलिफ्टेड मॉडेल लाँच केली आहे. ह्युंदाई यावर्षी भारतात आपली प्रमुख सेडान एलांट्रा सुद्धा लाँच करण्याची तयारी करीत आहे.
Hyundai Casper
Hyundai Casper esakal

ह्युंदाई मोटर्स भारतीय बाजारात सुरू असलेली पिछेहाट थांबवण्यासाठी आणि वाहनांची विक्री वाढवण्यासाठी धडपड करत आहे. यामुळेच ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा गाड्या ह्युंदाई लाँच करण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाई मोटर्स यावर्षी आपली एसयूव्ही कॅस्पर इंडियन मार्केटमध्ये आणू शकते. ह्युंदाई कॅस्परची टक्कर टाटा पंच आणि अपकमिंग सिट्रोएन सी ३ सारख्या कारशी होईल.

काही दिवसांपुर्वी ह्युंदाईने कॉम्पॅक्ट एसयुव्ही वेन्यू फेसलिफ्टेड मॉडेल लाँच केली आहे. ह्युंदाई यावर्षी भारतात आपली प्रमुख सेडान एलांट्रा सुद्धा लाँच करण्याची तयारी करीत आहे.

Hyundai Casper
Maruti car : फक्त ४० हजार रुपयांत खरेदी करा Maruti alto car

कसा आहे लुक

ह्युंदाई कॅस्परला ‘के1’ कॉम्पॅक्टच्या धर्तीवर डिझाईन केले जात आहे. ३,५९५ मीमी लांब, १,५९५ मिमी रुंद आणि १,५७५ मिमी उंच असेल. कारच्या पुढच्या बाजूला एक सिंगल स्लेट ग्रिल, राऊंड शेप हेडलॅम्प तसेच एलईडी डीआरएल आणि खालच्या बंपरमध्ये एलईडी रिंग्स मिळतील. यात फिनिश स्किड प्लेट आणि रुंद एअर डॅम मिळेल.

Hyundai Casper
Car Tips: गाडीचा मायलेज वाढवायचा? फॉलो करा 'या' टिप्स

इंजिन आणि पॉवरट्रेन

नवीन मायक्रो एसयूव्ही कॅस्परच्या इंजिन आणि पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, यात १.१ लीटर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिलं जाईल, जे ६९ पीएस पॉवर जनरेट करू शकेल. तसेच यात अजून एक इंजिन पर्याय मिळेल. यातलं दुसरं इंजिन १.२ लीटर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिलं जाईल, जे ८२ बीएचपी पॉवर जनरेट करू शकेल. तसेच ही कार ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह सादर केली जाऊ शकते.

Hyundai Casper
Tech Update : भारताची पहिली मेनस्ट्रीम स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल

सेफ्टी फिचर्स

या कारमध्ये ड्युअल टोन रूफ टेल, स्क्वेरिश व्हील आर्च, मल्टी-स्पोक अलॉय व्हील तसेच ब्लॅक प्लास्टिक क्लेडिंग मिळेल. तसेच या कारमध्ये ड्युअल टोन इंटीरियर, अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले सपोर्टसह ८ इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, ॲडजस्टेबल हँडरेस्ट, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ड्युअल एअरबॅग्ज या सारखे सेफ्टी फिचर्स दिले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com