नवीन ह्युंदाई i20 लाँचिंग लांबणीवर, आता सप्टेंबरमध्ये होणार लाँच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

ह्युंदाई i20 ची लाँचिंग सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी जून 2020 मध्ये ही कार बाजारात बाजारात येणार असल्याची  बातमी होती.

ह्युंदाई i20 ची लाँचिंग सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी जून 2020 मध्ये ही कार बाजारात बाजारात येणार असल्याची  बातमी होती. नवीन मॉडेल ३ इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. कंपनी 1.4 लीटर यू 2 सीआरडीआय डिझेल इंजिन असलेली वाहने बंद करून त्याऐवजी 1.5 लिटर टर्बो-डिझेल इंजिन असलेले वाहने बाजारात घेऊन येणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 सध्या हे इंजिन व्हिन्यू, क्रेटा, 2020 व्हर्ना आणि सेल्टोसमध्ये वापरण्यात येत आहे. हे इंजिन 113bhp पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह पेअर केले जाऊ शकते. कंपनी 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरसह डिझेल स्वयंचलित आवृत्ती देखील आणू शकते. नवीन ह्युंदाई आय 20 1.0 लीटर, 3 सिलिंडर टर्बो-चार्ज पेट्रोल इंजिन देखील दिले जाणार आहे. हे इंजिन सध्या व्हिन्यू, ऑरा आणि ग्रँड आय 10 मध्ये वापरले जाते. यासोबतच, 118bhp पॉवर असलेले इंजिन आणि 172Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी 6 स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक युनिट दिले जाऊ शकते. याशिवाय या कारला 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देखील देण्यात येईल जे 82bhp पॉवर 114Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात येईल.

जबरदस्त लुक
नवीन आय 20 चे फोटोही लीक झाले आहेत, ज्यामध्ये कारचा मागचा आणि पुढचा लूक दाखवला आहे. फ्रंट लूकबद्दलबोलायचे झाले तर नवीन आय 20 मध्ये मोठी फ्रंट ग्रील, शार्प हेडलॅम्प्स आणि सिग्नेचर एलईडी डीआरएल आहेत. हेडलॅम्पचे डिझाइन कंपनीच्या नवीन सोनोटासारखे आहे. मागील लुकबद्दल सांगायचे तर नवीन आय 20 मध्ये मागील बाजूस मोठ्या रॅपराऊंड एलईडी टेललाईट्स आहेत. मागील बंपरमध्ये मोठे डिफ्यूझर्स आहेत आणि डिग्गी दरवाजा बर्याडपैकी स्टाईलिश आहे. लीक केलेले फोटो नवीन ह्युंदाई आय 20 च्या ड्युअल-टोन व्हेरिएंटचे आहेत, ज्यामध्ये काळ्या रंगाच्या छतासह, काळ्या रंगाचे आउट साइड रीअर व्ह्यू मिरर आहेत. नवीन ह्युंदाई i20 ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी कंपनीला आशा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hyundai i20 2020 car launch postponed

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: