
esakal
नवरात्रीच्या सणासुरूवातीपूर्वी दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने युनायटेड युनियन ऑफ ह्युंदाई एम्प्लॉईज (UUHE) सोबतच्या करारांतर्गत १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी मासिक ३१ हजारपर्यंत पगारवाढ जाहीर केली आहे. ही वाढ प्रामुख्याने तंत्रज्ञ आणि कामगार वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी असून हजारो कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लावेल.