Smart Phone : आला रे आला! अवघ्या 9 मिनिटात फुल्ल चार्ज होणार स्मार्टफोन

सध्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण अधिकाधिक वेळ मोबाईलवर घालवतात.
Mobile Charging
Mobile ChargingSakal

Redmi Note 12 Series Launched : सध्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण अधिकाधिक वेळ मोबाईलवर (Mobile) घालवतात. यामुळे सारखा मोबाईल चार्ज करावा लागतो. मात्र, आता मोबाईलची बॅटरी सुपर फास्ट पद्धतीने चार्ज होणार आहे आणि तेही अवघ्या ९ मिनिटांमध्ये.

Mobile Charging
Apple Products च्या किंमतीत वाढ! युजर्सला मोठा फटका...एवढ्या हजारांनी किंमतीत वाढ
Smart Phone
Smart PhoneSakal

Redmi Note 12 सिरिज बाजारात दाखल झाली असून, कंपनीच्या नवीन सीरिजमध्ये Redmi Note 12, Note 12 Pro आणि Note 12 Pro+ यांचा समावेश केला आहे. या हँडसेट व्यतिरिक्त कंपनीने Redmi Note 12 Pro Explorer Edition आणि Redmi Note 12 Trend Edition देखील लॉन्च केले आहे.

या नवीन Redmi फोनमध्ये 12GB ची RAM आणि 210W फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. या फोनमध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हा फोन अवघ्या ९ मिनिटांमध्ये फुल्ल चार्ज होईल, असा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय या फोनमध्ये 200MP पर्यंतचा प्रायमरी कॅमेरादेखील देण्यात आला आहे. कंपनीने ही सीरिज नुकतीच चीनमध्ये लाँच केली आहे. (redmi Note 12 New Phone)

Mobile Charging
Samsung: नवीन फोन घेताय? सॅमसंग लवकरच घेऊन येतेय तीन दमदार स्मार्टफोन्स; काय असेल खास वाचा

चीनमध्ये Redmi Note 12 ची सुरुवातीची किंमत 1199 Yuan म्हणजेच सुमारे 13,600 रुपये इतकी आहे. तर, Note 12 Pro ची सुरुवातीची किंमत 1699 युआन म्हणजेच सुमारे 19,300 रुपये इतकी आहे. याशिवाय Redmi Note 12 Pro + ची किंमत 2099 युआन सुमारे 23 हजार रुपयांपासून सुरूहोते.

Mobile Charging
jio New Plan : इंटरनेटप्रेमींसाठी Jio चा भन्नाट प्लान; वर्षभराची व्हॅलिडिटी अन् भरपूर ऑफर्स
redmi note 12 series
redmi note 12 series

Redmi Note 12 5G चे फिचर्स

Redmi Note 12 5G फोनमध्ये कंपनीने 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्युशनसह 6.67-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच 8GB पर्यंतची RAM आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4G Gen 1 प्रोसेसर देण्यात आले आहे. यामध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे.

सेल्फीसाठी या फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून, 512GB पर्यंत मायक्रो SD कार्डला सपोर्ट करतो. फोनची बॅटरी 5000mAh ची आहे. जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Mobile Charging
Apple चा मोठा निर्णय, आता USB-C पोर्टसह लाँच होणार नवीन आयफोन

Redmi Note 12 Pro ची फिचर्स

Redmi Note 12 Pro फोन 1080 x 2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंच फुल एचडी + OLED डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा फोन 12 GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256 GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह लॉन्च केला आहे. प्रोसेसर म्हणून यामध्ये MediaTek Dimensity 1080 चिपसेट देण्यात आली आहे.

फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी बसण्यात आली आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Mobile Charging
Instagram : इन्स्टाग्राममध्ये लवकरच येणार नवे फीचर

Redmi Note 12 Pro + चे फिचर्स

Redmi Note 12 Pro + फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 12 GB पर्यंत LPDDR4x रॅम असलेल्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 1080 chipset बसवण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी कंपनीने या फोनमध्ये 200 मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा दिला आहे. याशिवाय 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेराही देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Note 12 Pro+ मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली असून, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com