Refrigerator Cleaning : फ्रीजची स्वच्छता न केल्यास आजारांचा वाढू शकतो धोका

Refrigerator Cleaning : फ्रीज नीट साफ न केल्यामुळे फ्रीजमध्ये कीटकांची पैदास होण्याची शक्यता असते. यामुळे, कीटक रेफ्रिजरेटरमध्ये प्रजनन करू शकतात.
Refrigerator Cleaning
Refrigerator Cleaningesakal

Refrigerator Cleaning : फ्रीज नीट साफ न केल्यामुळे फ्रीजमध्ये कीटकांची पैदास होण्याची शक्यता असते. यामुळे, कीटक रेफ्रिजरेटरमध्ये प्रजनन करू शकतात. हे कीटक फ्रीझरमध्ये ठेवलेल्या अन्नावर बसतात आणि ते संक्रमित करू शकतात. असे अन्न खाल्ल्याने पोटाच्या अनेक आजारांचा धोका वाढतो.

त्यामुळे तुमचा फ्रीज पूर्णपणे स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. हे देखील लक्षात ठेवा की जास्त अन्न साठवू नका. असे केल्याने फ्रीजमध्ये हवेची जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे अनेक प्रकारचे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो.

तीन चार दिवस पुरेसे

डॉक्टर म्हणतात की प्रत्येक अन्न रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची वेळ वेगळी असते. भाजीपाला रेफ्रिजरेटरमध्ये ३-४ दिवस ठेवता येतो. तुम्ही फळे आठवडाभर ठेवू शकता. याशिवाय अंडी, बीन्स आणि मांस दोन दिवसात खावे. पण शिजवलेले अन्न रेफ्रिजरेटरमध्ये पाच ते सहा तासांपेक्षा जास्त ठेवू नये.

Refrigerator Cleaning
Cleaning Hacks : फोन कव्हर कसे स्वच्छ करावे? जाणून घ्या अगदी सोपी पद्धत

शिजवल्यावर लगेच ठेवू नका

अन्न शिजवल्यानंतर१ ते २ तासांच्या आत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे. यावेळी, तुमच्या फ्रीजचे तापमान २ ते ३ अंशांच्या दरम्यान असावे, हे लक्षात ठेवा. तयार केलेली भाजी 3 ते 4 तास फ्रिजमध्ये ठेवून खावी. भाजी बाहेर काढण्यापूर्वी गरम करण्याचा प्रयत्न करा. तसेच हे लक्षात ठेवा की कच्चे आणि शिजवलेले अन्न स्वतंत्रपणे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे.

आजारांचा धोका

ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ फ्रिजमध्ये अन्न ठेवल्यानंतर ते खाल्ल्यास अनेक आजारांचा धोका असतो. अनेक प्रकरणांमध्ये, शिजवलेले अन्न खराब झाले तरी त्याचा वास येत नाही आणि लोक ते खातात, परंतु असे अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होण्यापासून टायफॉइडपर्यंतचा धोका असतो. हे असे होते कारण रेफ्रिजरेटरमध्ये दीर्घकाळ ठेवलेल्या अन्नामध्ये धोकादायक जीवाणू वाढू लागतात. जे पोटात जाऊन फूड पॉयझनिंग आणि टायफॉइडसारखे आजार निर्माण करतात.

(टिप - वरील माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com