
नेटवर्क नाही म्हणून फोन लावता येत नसेल तर हा पर्याय नक्की निवडा
मुंबई : मोबाईल फोनचे वापरकर्ते वाढतात तसतसे त्याचे नेटवर्कही कमी होत जाते. यावरच उपाय म्हणून अलीकडे वाय-फाय कॉलिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे नेटवर्क नसतानाही कॉल लावला जाऊ शकतो; पण त्यासाठी तुम्ही वाय-फाय नेटवर्क क्षेत्रात असणे आवश्यक आहे.
हेही वाचा: पासवर्डशिवाय कनेक्ट करा वायफाय; फॉलो करा 'या' टीप्स
iPhoneमध्ये WiFi Calling सुरू करण्यासाठी सर्वात आधी सेटींग्जमध्ये जावे लागेल. त्यानंतर Mobile Dataमध्ये जा. तेथे वाय-फाय कॉलिंगच्या पर्यायवर क्लिक करा. तेथे 'Wi-Fi Calling on This iPhone'चा पर्याय ऑन करा. Androind Usersनीसुद्धा सेटिंग्समध्ये जाऊन 'Network and Internet' या पर्यायावर क्लिक करावे. येथे WiFi Prefrenceचा पर्याय मिळेल. त्यानंतर Advanceवर क्लिक करावे. हा पर्याय प्रत्येक फोनमध्ये वेगवेगळाही असू शकतो.
हेही वाचा: Airtel यूजर्ससाठी खुशखबर! आता तुम्हाला मिळेल फ्री हायस्पीड वायफाय राउटर; 1 GBPS असेल स्पीड
Samsungमध्ये Settings पर्याय निवडून Connectionsमध्ये जाऊन 'WiFi Calling' ऑन करावे. वाय-फाय कॉलिंगचा पर्याय फक्त स्मार्टफोनमध्येच दिसेल. फीचर फोनमध्ये हा पर्याय दिसणार नाही.
Web Title: If There Is A Network Problem In Your Phone Try Wifi Calling
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..