फोनमधील 'या' अ‍ॅप्सच्या मदतीने मिळेल कर्ज; जाणून घ्या प्रोसेस

तुमच्याकडे Google Pay, PhonePe, Paytm सारखी UPI अ‍ॅप्स असल्यास, तुम्हाला लोन मिळू शकते.
Google Pay, Paytm, PhonePe for payment
Google Pay, Paytm, PhonePe for payment Sakal

तुमच्याकडे Google Pay, PhonePe, Paytm सारखी UPI अ‍ॅप्स असल्यास, तुमच्या फायद्याची बातमी आहे. तुम्हाला जेव्हाही पैशांची गरज असेल तेव्हा या तीन अ‍ॅप्लिकेशनद्वारे तुम्हाला कर्ज मिळू शकते. हे तीन UPI अ‍ॅप्स तुम्हाला झटपट कर्ज देतात, ज्यासाठी कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असते. फ्लिपकार्टची कंपनी PhonePe ने नुकतीच ही सुविधा सुरू केली आहे.

PhonePe, Google Pay आणि Paytm ही पेमेंट अ‍ॅप्स आहेत जी UPI वर चालतात. हे सर्व अ‍ॅप्स UPI पेमेंट सिस्टम अंतर्गत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतात. ग्राहकांना PhonePe वरून थेट कर्ज मिळत नाही, पण मूळ कंपनी फ्लिपकार्टकडून कर्ज मिळवण्यात मदत होते. कर्ज घेण्यासाठी, तुमच्याकडे Flipkart तसेच PhonePe अ‍ॅप्स असणे आवश्यक आहे. तसेच, शून्य टक्के कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सिबिल स्कोअर 700 प्लस असणे आवश्यक आहे. PhonePe द्वारे तुम्हाला 60,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. (If you have UPI apps like Google Pay, PhonePe, Paytm, you can get a loan from them.)

Google Pay, Paytm, PhonePe for payment
तुमच्या नावावर कुणी घेतलंय कर्ज? पॅनकार्ड वापरून असं तपासा

PhonePe द्वारे कर्ज कसे घेऊ शकता?

  • सगळ्यात आधी तुम्हाला Flipkart किंवा PhonePe डाउनलोड करावे लागेल.

  • अ‍ॅपवर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड करा.

  • यानंतर फ्लिपकार्टच्या प्रोफाइल सेगमेंटमध्ये जा.

  • Flipkart Pay Later ऑप्शनवर क्लिक करा.

  • आवश्यक कागदपत्रे फ्लिपकार्टवर द्यावी लागतील.

  • तुमच्याकडे अकाउंट नसल्यास, तुम्हाला फ्लिपकार्ट पे लेटर अकाउंट तयार करावे लागेल.

  • यामध्ये तुम्हाला CIBIL स्कोर विचारला जाईल.

  • CIBIL स्कोअर चांगला असेल तर कर्ज सहज उपलब्ध होईल.

  • यानंतर, तुम्ही 'My Money' पर्यायावर क्लिक करून UPI खात्यातील शिल्लक तपासू शकता.

  • इथे तुम्हाला कर्जाचे पैसे आले की नाही हे कळू शकेल.

Google Pay, Paytm, PhonePe for payment
तुमच्या नावावर कुणी घेतलंय कर्ज? पॅनकार्ड वापरून असं तपासा

गुगल पे वरुन कर्ज कसे मिळवाल?

  • सगळ्यात आधी Google Pay उघडा.

  • यानंतर मनी सेक्शनमध्ये जाऊन लोन ऑप्शनवर क्लिक करा.

  • लोन ऑफरवर त्यावर क्लिक करा.

  • इथे तुम्हाला प्री-अप्प्रूव्ह लोनचा पर्याय दिसेल.

  • तुम्हाला जी ऑफर घ्यायची आहे त्यावर क्लिक करा.

  • इथे कर्जाची रक्कम आणि वेळ निवडा.

  • कर्जासाठी लागणारी फी आणि चार्जेसही इथे दिसतील.

  • माहिती मिळवण्यासाठी रिव्ह्यूवर क्लिक करा, योग्य वाटल्यास Continue वर क्लिक करा.

  • एक्सेप्ट अँड अप्लायवर क्लिक करून तुम्हाला OTP मिळेल.

  • ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करा, त्यानंतर लोन कन्फर्म करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com