तुमच्या नावावर कुणी घेतलंय कर्ज? पॅनकार्ड वापरून असं तपासा

तुमच्यावर किती कर्ज आहे, हे पॅनकार्डच्या माध्यमातून तपासता येतं.
pan card
pan cardesakal

पॅन नंबर अर्थात पर्मनंट अकाउंट नंबर (PAN) हा एक 10 डिजिट की अल्फान्यूमेरिक नंबर आहे जो तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटद्वारे दिला जातो. भारतात एक प्रकारे पॅनकार्डचा वापर अनिवार्य आहे. करदाते किंवा इतर वापरकर्ते ज्यांना उत्पन्नाची माहिती देणे आवश्यक आहे, अशा सर्वांना पॅनकार्ड आवश्यक आहे. याशिवाय अनेक आर्थिक व्यवहारासाठी पॅन अनिवार्य आहे. पॅन एखाद्या व्यक्तीच्या सर्व करसंबंधित व्यवहारांना ट्रॅक करण्यास साहाय्य करते. याचा अर्थ असा आहे की वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या प्रत्येक कर्जाची नोंद संबंधित पॅनकार्डवर केली जाते. (Important news; Who has taken loan on your PAN card! check like this)

pan card
पॅन कार्ड Active आहे की Inactive? जाणून घेण्यासाठी फॉलो करा सोपी पद्धत

तुमच्यावर किती कर्ज आहे, हे पॅनकार्डच्या माध्यमातून कसं तपासायचं?

  • क्रेडिट स्कोअर युजरच्या कर्जासह सर्व व्यवहारांचा हिशोब ठेवते. अशा अनेक संस्था आहेत ज्या क्रेडिट स्कोअर अपडेट करत राहतात. हे स्कोअर वित्तीय संस्थेला एखाद्या व्यक्तीच्या परतफेडीच्या इतिहासाचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

  • क्रेडिट स्कोअरची गणना आणि रेकॉर्ड करणाऱ्या संस्थांमध्ये CIBIL, Experian, Equifax किंवा CRIF High Mark यांचा समावेश होतो.

  • या संस्था वापरकर्त्यांना त्यांचे नवीनतम क्रेडिट स्कोअर देऊ शकतात. एकदा तुम्ही वरीलपैकी कोणतेही क्रेडिट ब्युरो वापरून तुमच्या क्रेडिट स्कोअरची गणना केली की ते त्या नावाखाली सक्रिय कर्ज किंवा क्रेडिट कार्ड दर्शवेल.

pan card
पॅन कार्ड Active आहे की Inactive? जाणून घेण्यासाठी फॉलो करा सोपी पद्धत
  • तुम्हाला खुली क्रेडिट लाइन किंवा तुम्ही अर्ज न केलेले कर्ज आढळल्यास, ते तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाल्याचे सूचित होते.

  • तुमचा नवीनतम क्रेडिट स्कोर मिळवण्यासाठी तुम्ही क्रेडिट ब्युरोच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. नवीनतम क्रेडिट स्कोअर तयार करण्यासाठी तुम्हाला तुमची काही वैयक्तिक माहिती प्रविष्ट करावी लागेल.

  • तुम्हाला तुमच्या क्रेडिट खात्यामध्ये संशयास्पद व्यवहार आढळल्यास, त्याबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी तुम्ही त्या वित्तीय संस्थेला त्याची तक्रार करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com