Cheap Flight Tickets: दिवाळी हॉलीडेजमध्ये स्वस्त फ्लाईट हवी असेल तर फॉलो करा या पाच सोप्या टिप्स

फ्लाइट बुक करताना या काही टीप्स तुम्हाला निश्चितच फायदेशीर ठरतील
Cheap Flight Tickets
Cheap Flight Ticketsesakal

दिवाळी येणार म्हटलं की सगळीकडे आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं. कर्मचाऱ्यांना दिवाळी हॉलीडे ही बाहेर फिरायला जायची एकमेव संधी असते. मात्र दिवाळीच्या ऐन तोंडावर सगळंच महागलंय. मग ते दिवाळीचं फराळ असो किंवा मग ट्रेन किंवा बस तिकिटं. अशा वेळी जर तुम्ही हॉलीडे प्लान करत असाल तर तुमच्यापुढे असलेला ऑप्शन म्हणजे फ्लाइट. त्यामुळे फ्लाइट बुक करताना या काही टीप्स तुम्हाला निश्चितच फायदेशीर ठरतील.

ऐन दिवाळीत सगळं काही महागलं असतानाही तुम्ही स्वस्त तिकिट बुक करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही सोप्य टीप्स फॉलो कराव्या लागतील. दिवाळीत अगदीच स्वस्त फ्लाइट तिकिट तुम्हाला मिळणार नाही. मात्र काही गोष्टींची काळजी घेता तुमचे अतिरिक्त पैसे नक्कीच वाचतील.

वेगवेगळ्या वेबसाइटवर चेक करा दर

जर तुम्हाला फ्लाइटने कुठे प्रवास करायचा असेल तर वेगवेगळ्या वेबसाइटवर चेक करा. अनेकदा काही स्पेसिफिक साइटवर तिकिट महाग असतात. अशा वेळी अन्य दुसऱ्या साइट्सवर तुम्हाला तिकिट स्वस्तात मिळू शकतं.

ऑफरवर नजर ठेवा

अनेक वेबसाइट्सवर प्रमोशनसाठी फ्लाइट तिकिटवर ऑफर ठेवल्या जातात. ही ऑफर कुपन कोड किंवा बँक डिस्काउंटमध्ये असू शकते. अशा वेळी तुम्ही या कूपन कोडचा वापर करून तुमची फ्लाइट तिकिट स्वस्त दरात मिळवू शकता.

Incognito mode वर सर्च करा फ्लाइट

फ्लाइट तिकिटला जास्तीत जास्त सर्च केल्यास अनेकदा त्याचे दर वाढवले जातात. त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्राउजरमध्ये Incognito mode किंवा प्रायवेट मोडवर फ्लाइटच्या किमती चेक करू शकाता. इथून तुम्हाला स्वस्त फ्लाइट तिकिट मिळून जाइल.

Cheap Flight Tickets
Festive Offer : ही क्रेडीट कार्ड कंपनी देत आहे २२.५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक

IRCTC एअरवरही तिकिट चेक करा

IRCTC एअरवरही फ्लाइट तिकिट चेक करण्यास विसरू नका. IRCTCवर अनेकदा नियमित प्राइज दाखवल्या जाते. त्यामुळे एकदा त्यावरही नक्की चेक करा.

एक्सेटेंशनची मदत घ्या

अनेकदा तुम्ही एक्सटेंशनच्या माध्यमातूनही सहजपणे कमी दरात तिकिट शो करणाऱ्या वेबसाइट एक्सप्लोअर करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com