
ही काळजी घेतलीत तर लाईटबिल ३ हजारांनी कमी होऊ लागेल...
मुंबई : वीज बिलात बचत करण्यासाठी आधी तुम्हाला घरात काही बदल करावे लागतील. असे न केल्यास जास्त वीज बिल येऊ शकतं.
उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड येते. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही वीज बिल वाचवायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या घरातील काही गोष्टींमध्येही बदल करावे लागतील.
घरातील काही गोष्टींमध्ये बदल करून तुम्ही दरमहा अती जास्त येणारे लाईट बिल कमी करु शकता.
लाईट बिल कसे वाचवायचे?
लाईट बिलात बचत म्हणजे तुम्हाला घरातील काही गोष्टींचा कमी वापर करावा लागेल.
जसे की रुम मधून बाहेर निघताना लाईट ,पंखे बंद करुनच बाहेर निघावे ही सवय घरातील प्रत्येक व्यक्तीला लावुन घेणे महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्यात एसीमुळे सर्वाधिक वीज बिल वाढते, अशा परिस्थितीत तुम्हाला एसीची सर्वाधिक काळजी घ्यावी लागते.
आजकाल इन्व्हर्टर एसी येत आहेत, जर तुमच्या घरात जुना नॉन-इन्व्हर्टर एसी लावलेला असेल तर तो एसी काढून तुम्ही नवीन एसी लावू शकता. एसी घेताना तो ४.५ स्टार रेटिंग एसी घ्यायला विसरू नका. कारण या एसीच्या मदतीने तुम्ही तुमचे वीज बिल सहज कमी करू शकता.
याशिवाय तुम्ही तुमच्या घरातील एसीची सर्व्हिसिंग नियमितपणे करणे गरजेचे आहे.
अनेक वेळा एसीची गरज सताना तुम्ही एसी चालवता,पण ठराविक वेळ एसी लावुन बंद केली तरी तुमची रुम थंड राहते.
आता घरातील दुसऱ्या क्रमांकाचे जास्त लाईटबिल कोण घेते तर त्यात गिझरच्या नावाचाही समावेश आहे. आता तुम्ही विचार करत असाल की उन्हाळ्यात गिझर जास्त वीज कशी वापरू शकतात?
पण हा हिवाळा तुमच्यासाठी नवीन टेन्शन नक्कीच निर्माण करू शकतो. त्यामुळे तुम्ही त्यात बदलही करू शकता. तुम्ही बदल करून घरात गॅस गिझरही लावू शकता. गॅस गीझर देखील चांगले काम करते. गॅस गिझर पाणी अगदी सहज गरम करतो.
पण गॅस गिझर वापरताना थोडी काळजी घ्यावी लागते.
Web Title: If You Take Care Of This The Light Bill Will Be Reduced By
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..