
esakal
भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक मोठी झेप घेतली आहे. आयआयटी हैदराबादने 6G तंत्रज्ञानाचा प्रोटोटाइप यशस्वीपणे विकसित केला असून 2030 पर्यंत हे तंत्रज्ञान मार्केटमध्ये आणले जाणार आहे. हे तंत्रज्ञान केवळ 5G पेक्षा वेगवान नसेल तर गावांपासून शहरांपर्यंत, जमीन, आकाश आणि समुद्रात हायस्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या यशामुळे भारत जागतिक तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळवण्यास सज्ज आहे.